कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते, खा. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवस निमित्त राहुलजी गांधी यांना देशाचे पंतप्रधान करण्याचा देशभरातील व सोलापूर कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संकल्प केला.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते, खा. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवस निमित्त राहुलजी गांधी यांना देशाचे पंतप्रधान करण्याचा देशभरातील व सोलापूर कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संकल्प केला.

तसेच यावेळी शेतकरी विरोधी कृषी बिलाची होळी करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांचा विरोध केला.

सोलापूर // प्रतिनिधी 

अखिल भारतीय कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांचा वाढदिवस निमित्त राहुलजी गांधी यांना देशाचे पंतप्रधान करण्याचा संकल्प करून आज संकल्पदिन म्हणून सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली म्हणून काँग्रेस भवन येथे साजरा करण्यात आला.
तसेच कार्यकर्त्यांनी शेतकरी विरोधी कृषी बिलाची होळी करण्याच्या प्रयत्न करताना पोलिसांनी विरोध केला.

यावेळी शहर अध्यक्ष बोलताना प्रकाश वाले म्हणाले की काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस राहुल चा वाढदिवस म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी पर्वणी मात्र गत दीड वर्षापासून देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. या काळात शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्यांची जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदा, व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले, देशोधडीला लागले आहेत, दिशाहीन नेतृत्वामुळे देश एका अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहेत कोरोनामुळे मोठी हानी होऊ शकते असा इशारा देत वेळीच उपाययोजना करा अशा सूचना राहुलजी गांधी यांनी पंतप्रधानांना केली होती. परंतु हा जबाबदारीचा सल्ला न ऐकता देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकेकोरपणामुळे मरणाच्या खाईत लोटण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केला आहे. गंगा नदीत मृतदेह तरंगताना ते भयावह दृष्य जगाने पाहिले पण भाजप सरकारने त्यातूनही काही बोध घेतला नाही रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत होता असा निरो चा बेफिकीरपणाचा दाखला दिला जातो त्याही पुढे चार पावले टाकत पंतप्रधानांनी कोरोना काळात जनतेच्या जीविताशी अक्षरशा खेळ केला आहे स्वतः प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी वेळोवेळी इव्हेंटबाजी केली. केंद्रातील मोदी सरकारने राहुलजींचा आपुलकीचा सल्ला ऐकून वेळीच उपाययोजना केल्या असता तर देशाचे स्मशान झाले नसते कोरोनाच्या महामारीने देशात विदारक चित्र असताना राहुलजी गांधी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करणे काँग्रेस विचारधारेला धरून नाही ते पटणार नाही अशा संकटसमयी देशाच्या नागरिकांसोबत खंबीरपणे उभे राहणे हीच काँग्रेसची संस्कृती आहे आज देशाला वाचवायचे असेल तर राहुलजी गांधींच्या विचारांची दूरदृष्टी पणाची गरज आहे हेच लक्षात घेऊन राहुलजी लाओ देश बचाओ चा नारा आपण दिला पाहिजे राहुलजी गांधी यांच्याशिवाय आता देशाला पर्याय नाही राहुलजी गांधींनी आत्तापर्यंत जे जे सांगितले कालांतराने ते निर्णय घेणे मोदी सरकारला भाग पाडले आहे मोदी सरकारने वेळीच घेतले असते तर आज देशाची राखरांगोळी झाली नसेल राहुलजी गांधी यांची दृष्टी व दिशा अगदी स्पष्ट आहे म्हणून त्यांनी वेळोवेळी सरकारला सूचना केल्या असा दूरदृष्टीचा नेता देशासाठी सर्वोच्च पंतप्रधानपदावर असावा म्हणून आज सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राहुजी को लाना है देश बचाना है असा संकल्प त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन राहुलजी गांधी यांच्या वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा केला आहे.

यावेळी कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, संजय हेमगड्डी, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेवक नरसिंग कोळी, नगरसेविका परवीन इनामदार, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, उदय चाकोते, देवाभाऊ गायकवाड, बाबू म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, अशोक कलशेट्टी, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, पशुपती माशाळ, किसन मेकाले गुरुजी, अंबादास गुत्तीकोंडा, अनिल मस्के, हारून शेख, जेम्स जंगम, युवराज जाधव, अनुपम शहा, परशुराम सतारेवाले, राजेश झंपले, चौबल मनसावाले, मंगल मंगोडेकर, सुमन विटकर, लक्ष्मीनारायण दासरी, लतीफ शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here