कै. सुरेश पाटील यांची तृतीय पुण्यस्मरण दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी! आम्ही सर्वजण अविरतपणे सर्व सामान्य जनतेसाठी समाजकार्य सुरू ठेवू:उमेश दादा पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मा.उमेशदादा पाटील यांचे वडील कै.सुरेश (काका) पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त सर्व सामान्य गोरगरिब-गरजु,विधवा, परितक्त्या, आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका या सर्व महिलांना श्रीमती लोपामुद्रा सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम आज शनिवारी दि.६ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानी तोरणागड नरखेड येथे पार पडला सुरूवातीला पारंपरिक पद्धतीने भजन कीर्तन करण्यात आले त्यानंतर १२ वाजता फुले टाकण्याचा कार्यक्रम पार पडला तसेच उमेश (दादा) पाटील यांनी सर्वांना संबोधित केले.

या कार्यक्रमावेळी‌ भाजपचे संतोष (आण्णा) पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश (दादा) पाटील यांच्यावर प्रेम करणारे तालुक्यातील असंख्य सर्व आजी माजी पदाधिकारी,कार्यकर्ते,समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कै.सुरेश (काका) पाटील यांच्या प्रतिमेचला अभिवादन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here