केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या पक्षाचे खासदार महाडिक यांचे कडेच भीमाची सत्ता सोपवविणे फायद्याचे! भीमाचे गंजलेले पत्रे बदलण्याची इच्छाशक्ती न दाखविणा-यांना निवडणूक लावण्याचा अधिकार आहे का हाच सूर!-प्रा.संग्राम चव्हाण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भीमाचे गंजलेले पत्रे सुद्धा बदलण्याची इच्छाशक्ती दाखवली नाही,भीमाच्या पंपातून दरमहा डिझेलचा रतीब लावला,गेस्ट हाऊस वरचा राजेशाही पाहुणचार,बेसुमार कामगारभरती केली कि ज्यामुळे संस्थेवर आर्थिक ताण वाढला, शेतकऱ्यांना परवड- णाऱ्या 265 जातीच्या ऊस लागवडीला रिकव्हरी खाली येते म्हणून बंदी घातली,कारखान्याचा कसलाही विकास न करता कर्जामध्ये भरमसाठ वाढ झाली,या प्रमुख आरोपांसह इतर अनेक आरोपांमुळे जुन्या संचालक मंडळाला भीमाच्या सुज्ञ सभासदांनी विक्रमी मतांनी पराभूत करून घरचा रस्ता दाखवला होता. हा भूतकाळ सभासदांच्या चांगला लक्षात असून त्यावेळी भीमाचा एफ आर पी चा कायदा अस्तित्वात नसल्या मुळे घळघळीत नफ्याचे दिवस असताना व सर्वार्थाने “सुवर्ण सद्दिचा सुकाळ” असतानाही गंजलेले पत्रे सुद्धा बदलण्याची इच्छाशक्ती न दाखवू शकणार्या मंडळींना राज्यसभा खा.धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ज्या संचालक मंडळाने प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा 200 कोटींचा एक्सपान्शन व को-जनरेशन प्रकल्प उभा करून दाखवले. त्यांच्या विरोधात भिमाची निवडणूक लावण्याचा नैतिक अधिकार आहे का?असाच सूर सर्व सभासदांमधे आहे. असे प्रतिपादन भीमा परिवाराचे संघटक समन्वयक तथा सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा संघटक समन्वयक प्रा.संग्राम चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.विद्यमान संचालक मंडळाने इथेनॉल प्रकल्पाची उभारणीची सर्व तयारी पूर्ण केली असून एफ्आरपी प्रमाणे सर्व सभासदांची बिले पूर्णपणे वाटप केली असून एप्रिल महिन्याच्या1ल्या आठवड्यातील उर्वरित ऊसबिलांची कामगारांच्या उर्वरित थकीत पगारांची आर्थिक तरतूदही केली आहे.विद्यमान चेअरमन खा.धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाचा कारभार सभासदांना पसंद असून कारखान्याचा योग्य विकास होत असताना आता निवडणूक लावण्याची गरजच काय? असा प्रश्न भिमाचे सुज्ञ सभासद विचारत आहेत. ही निवडणूक” बिनशर्त बिनविरोध” व्हावी व भीमाचा कारभार वर केंद्रात व खाली राज्यात दोन्हीकडे सत्ता असलेल्या पक्षाचे एक प्रभावशाली खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाकडे सोपवावा त्यामुळे कारखान्याला राजकीय अनुषंगिक फायदे होतील अशीच इच्छा सर्व सभासद बोलून दाखवताना दिसत आहेत.या सभासदांच्या इच्छेचा मान निवडणूक लावण्याचा प्रयत्नात असलेल्या मंडळींनी केला पाहिजे. विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा कारखान्याचे हित कशात आहे याचा विचार सर्वांनी केला पाहिजे असे म्हणत भीमाची आगामी निवडणूक खासदार श्री.धनंजय महाडिक यांना बिनशर्त बिनविरोध द्यावी या विरोधकांना वारंवार केल्या गेलेल्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. सतीश अण्णा जगताप व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here