केंद्रातील मोदी सरकारच्या आर्थिक अडवणूकीमुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत:- विश्वजित कदम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

केंद्रातील मोदी सरकारच्या आर्थिक अडवणूकीमुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत:- विश्वजित कदम

 

महापालिका व जिल्हापरिषद निवडणुकीची जोमाने तयारी करा.

 

महाराष्ट्राचे सहकार व कृषी राज्यमंत्री मा. विश्वजीत कदम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटी पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक कॉंग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित केली होती यावेळी जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुण शर्मा, सोमपा गटनेते चेतन नरोटे, माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शेळके, करमाळा नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मोहोळचे नगराध्यक्षा शाहीन शेख, नगरसेवक शिवा बाटलीवाला, नरसिंग कोळी, नगरसेविका अनुराधा काटकर, परवीन इनामदार, वैष्णवीताई करगुळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना सहकार कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले की, मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकरी अडचणीत सापडला आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर आंदोलन करत आहेत त्यांच्याशी साधी चर्चा सुद्धा मोदी सरकार करायला तयार नाही. मागील भाजप सरकारच्या कार्यकाळात ऊर्जा खात्यात चाळीस हजार कोटी रुपयांची तूट वाढली होती ती भरून काढतानाच राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे वीज खंडित न करण्याचे निर्णय घेतला आहे. शेतीमालाचे उत्पादन वाढल्यामुळे किमतीवर परिणाम झाले आहे. पण महाविकास आघाडी सरकार शेतकऱयांबरोबर आहे. भाजपची मंडळी फसवे आहेत म्हणून तीन पक्षांनी मिळुन सर्वसामान्य जनतेसाठी युती करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. भाजपने खोटी व भरपूर निकष लावून फसवी कर्जमाफी केली होती. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये मला सहकार, कृषी खाते मिळाले. साधे सोपे निकष लावून महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी केली.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे राज्य शासनाचे उत्पन्न कमी झाले आहे. केंद्रातील मोदी सरकारने तीस हजार कोटींची जी एस टी ची रक्कम देत नाही त्यामुळे आज महाराष्ट्र आर्थिक संकटात आहे. कोरोना पार्श्वभूमीवर कोणतेही पूर्वसूचना न देता मोदी सरकारने लॉकडाऊन केला गेला कोट्यवधी लोक रस्त्यावर भुकेने व्याकुळ चालत गावी गेले त्यात हजारो मेले महाराष्ट्राला जाणीवपूर्वक लसी व रॅमिडिसीवर, औषधांचा पुरवठा कमी करण्यात आला. पण महाविकास आघाडी सरकारने धाडसी पाऊल उचलून कोरोनापासून संरक्षण करणे, उपचार करणे, कार्यक्षम आरोग्य सुविधा उभारले, आरोग्यासाठी भरपूर निधी दिला यामुळे आज कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे.

पुढे बोलताना विश्वजीत कदम म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देत इंग्रजांना हाकलून दिले तर हा भाजप काय चीज आहे यांनाही सत्तेवरून पायउतार करण्यासाठी तयार रहा आज रस्त्यावरील लढाई सोबत सोशल मीडियावर ही लढाई लढायचे आहे. गेले सात वर्षे भाजप देशाची फसवणूक करत आहे. सोलापूर जिल्ह्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्यासारखे खंबीर आणि सक्षम नेतृत्व आहे. युवकांनी पेटून उठून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी स्वतःच्या हिमतीवर करून सत्ता काबीज करा. डॉ. धवलसिंह मोहिते सारखे धडाडीचे युवक आज जिल्हा अध्यक्ष झालेत सोलापूर जिल्हा हा विश्वजीत कदम यांचे दुसरे घर असून कधीही आवाज द्या तुमच्या खांद्याला खांद्या लावून लढायला तयार आहे.

यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, माजी महापौर नलिनीताई चंदेले, आरिफ शेख, युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश चिटणीस नरसिंह असादे, किसन मेकाले गुरुजी, पंडित सातपुते, अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, तालुका अध्यक्ष सौदागर जाधव, जीवनदत्त अरगडे, प्रा. सिद्राम सलवदे, राजेश भादुले, हणमंत मोरे, गोरख लबडे, वसीम पठाण, दादासाहेब साठे, अशोक कलशेट्टी, नागनाथ कदम, हसीब नदाफ, हाजीमलंग नदाफ, भारत जाधव, राजन कामत, सिद्राम अट्टेलुर, भिमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, गणेश साळुंखे, विवेक कन्ना, सैफन शेख, योगेश मार्गम, सिद्धराम चाकोते, दत्तू बंदपट्टे, युवराज जाधव, अमोल भोसले, नागेश गंगेकर, सुरेश शिवपुजे, बसवराज बगले, सिकंदरताज पाटील, अभिराज शिंदे, सुलेमान तांबोळी, उपेंद्र ठाकर, सायमन गट्टू, राहुल वर्धा, प्रमिला तुपलवंडे, सुमन जाधव, संजय गायकवाड, गोविंद कांबळे, शकील मौलवी, साध्याताई काळे, अनिल मस्के, राहुल बोलकोटे, VD गायकवाड, नुराहमद नालवार, दीनानाथ शेळके, विजयकुमार हत्तुरे, अनंत म्हेत्रे, सुनील सारंगी, राहुल गोयल, शरद गुमटे, बाबुराव क्षीरसागर, सुभाष वाघमारे, सागर शहा, गोविंदराव पंके, मल्लेशी बिडवे, शिवयोगी बिराजदार, दत्ता गाढवे, शंकर सुरवसे, निलेश व्हटकर, रवींद्र शिंदे, शाहू सलगर, श्रीकांत दासरी, शिवाजी साळुंखे, सोमनाथ व्हटकर, अंबादास नाटेकर, हरीश गायकवाड, रजाक कादरी, इम्तियाज बेलीफ, महेश मस्के, राधाकृष्ण पाटील, बाबासाहेब पाटील, निखिल मस्के, बिरा खरात, समाधान रोकडे, अप्पू शेख, सुधीर लांडे,संजय खरटमल, शंकर मोरे, राजेश झंपले, संघमित्रा चौधरी, पारुताई काळे, शोभा बोबे, अरुणा बेंजरपे, मुमताज तांबोळी, चंदाताई काळे, संतोषी गुंडे, आकाश कांबळे, गणेश गायकवाड, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here