किसान कॉंग्रेसच्या पंढरपुर तालुकाध्यक्षपदी अक्षय शेळके यांनी निवड!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी येथील कॉंग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते अक्षय शेळके यांची पंढरपूर तालुका किसान कॉंग्रेसच्या पंढरपुर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या हस्ते व सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवडीचे पत्र देवून शेळके यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. अक्षय शेळके यांनी यापूर्वी जनसेवा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका पार पाडलेली आहे. अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी आंदोलन, उपोषण करून प्रशासनाला जागे करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. याचीच दखल घेवून त्यांना पंढरपूर किसान कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी काम करण्याची संधी देण्यात आलेली आहे.
निवडीनंतर अक्षय शेळके म्हणाले की, अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी , एच. के.पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात,कार्याध्यक्षा प्राणिती शिंदे , भारतीय राष्ट्रीय किसान कॉंग्रेसचे समन्वयक प्रकाश घाळी, सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील,पश्चिम महाराष्ट्र किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष संदीप साठे, किसान कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. संग्राम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही दिली.

यावेळी जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष आण्णासाहेब इनामदार, बजरंग बागल, नागेश गंगेकर, सुहास भाळवणकर, जिल्हा सरचिटणीस किशोर जाधव, मोहोळ चे नगराध्यक्षा शाहीन शेख, महिला जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षा साधना उगले, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुंनजय पवार,अकलूज शहराध्यक्ष नवनाथ साठे, तालुकाध्यक्ष अमरजित पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष राहुल पाटील, अशोक पाटोळे, संग्राम जाधव, राजू उराडे, दीपक पिंजारे, देवानंद इरकल आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here