कामगारांच्या योगदानामुळेच दामाजी कारखान्याची प्रगती:आ. श्री समाधान आवताडे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कामगारांच्या योगदानामुळेच दामाजी कारखान्याची प्रगती:आ. श्री समाधान आवताडे

कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व।मारवाडी वकील साहेब, स्व।रतनचंद शहा शेठजी यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेल्या शेतक-यांच्या या राजवाड्याचे पावित्र्य जपण्याचे काम आपणा सर्वांचे आहे। या संचालक मंडळाला सहा साडेसहा वर्षाचा कार्यकाळ मिळाला। नैसर्गीक आपत्ती, कोरोनाचा काळ अशा अनेक संकटाशी आपण मुकाबला केला। या काळात अनेक कारखाने बंद राहिले। परंतु कामगार, शेतकरी व तोडणी ठेकेदारांचे सहकार्याने संचालक मंडळाने मागील सहा वर्षात एकही हंगाम बंद न ठेवता गाळप केले आहे। कामगारांना १२।५ टक्के वेतनवाढ दिल्याबद्दल संत दामाजी साखर कारखान्यावर स्नेहभोजन व संचालक मंडळाचा सत्कार सोहळा कामगार संघाटनेतर्पेŠ आयोजीत करणेत आला होता। सदर प्रसंगी कारखान्याचे चेअरमन आमदार समाधान आवताडे बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले, राजकारण हा विषय माझ्या आवडीचा नव्हता। परंतु मागील ंसंचालक मंडळामध्ये मी संचालक पदावर असताना कारखान्यात चाललेले कामकाज माझ्या बुध्द्ीला पटत नव्हते। परंतु बहुमतापूढे माझे कांही चालत नव्हते। तालुक्यातील शेतकÅयांच्या विकासासाठीच मी कारखान्याच्या माध्यतातून राजकारणात आलो। माझ्या राजकारणाची सुरुवातच दामाजी कारखान्यापासून झाली आहे। या कारखान्याची टेक्नाùलाùजी ३२ वर्षापूर्वीची आहे। यामध्ये माùडीफिकेशन करणे गरजेचे असल्याने आमचे संचालक मंडळाने सायलो सिस्टीम किंवा इतर कांही माùडीफिकेशन केले आहेत। याचा फायदा कारखान्याला झाला आहे। प्रत्येक हंगामात मजुरीसाठी होणारी कोटयावधी रुपयाची बचत झाली आहे। डिस्टीलरीचे भूमीपुजन होवून अनेक दिवस झाले आहेत। परंतु ४५ केएलपीडी ची परवानगी असल्याने सदर प्रकल्प सुरु करणेत आला नाही। १ लाख केएलपीडी ची परवानगी घेवून सदर प्रकल्प सुरु केल्यास याचा फायदा कारखान्यास होणार आहे। शेतक-यांची बिले, कामगारांचा पगार देण्यामध्ये मागे पुढे झाले असेल परंतु ती वेळेवर देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला आहे। वेळ पडल्यावर संचालक मंडळाने आपल्या खिशातील पैसे देवून प्रसंगी स्वतःच्या जमीनी गहाण ठेवून कारखान्यास रक्कम उपलब्ध करुन दिली आहे।
प्रत्येक निवडणूकीत सर्व कामगारांनी माझ्या खांद्याला खांदा लावून साथ दिली आहे यामुळेच या संस्थेचा चेअरमन आणि आमदार म्हणून माझे काम चालू आहे। मी पैशासाठी राजकारणात आलेलो नाही। आजपर्यंत राजकीय ताकद कमी पडत होती। परंतु तुम्ही मला संधी दिली आहे। यापुढे भविष्यामध्ये निश्चीतच ही कसर भरुन काढणार आहे। यापुढेही सभासद शेतकरी, कामगार यांना न्याय देण्याचे काम मी करणार आहे। कामगारांना १२ टक्के पगारवाढ संचालक मंडळाने दिल्याने आपण माझा व संचालक मंडळाचा सत्कार केल्याबद्दल चेअरमन, आमदार श्री समाधान आवताडे यांनी कामगार संघटनेचे आभार व्यक्त केले।
सदर प्रसंगी खासदार श्री जयसिध्देश्वर स्वामी महाराज मनोगतामध्ये म्हणाले, एक सत्कार्य होण्यासाठी कारणही सत्य असावं लागत। सहा वर्षे कारखाना निर्वीवादपणे संचालक मंडळाने चालविला याचे समाधान कामगारांमध्ये आहे। त्यामुळेच हा सत्कार या ठिकाणी आयोजीत केला आहे। तुमचे चेअरमन आमदार समाधान आवताडे हे राजकारणी वाटत नाहीत। राजकारण्यांची भाषा वेगळी असते। आवताडे यांचा दृष्टीकोण सकारात्मक आहे। एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ यासाठी त्यांची धडपड आहे। शेतक-यांसाठी, कामगारांसाठी कटिबध्द असणारे हे नेतृत्व आहे। त्यांचे संकल्प मोठे आहेत, यासाठीच त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहाणे गरजेचे असल्याचे शेवटी ते म्हणाले।
या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक लक्ष्मण जगताप, राजेंद्र सुरवसे, राजीव बाबर, राजेंद्र पाटील, शिवयोग्याप्पा पुजारी, बापू काकेकर, बसवेश्वर पाटील, रामकृष्ण चव्हाण, लक्ष्मण नरुटे, भुजंगराव आसबे, सुरेश भाकरे, बाळासोा शिंदे, अशोक केदार, विजय माने, संचालिका सौ।स्मिता म्हमाणे, कविता निकम, तसेच प्रा।येताळा भगत सर, प्रदिप खांडेकर, शशिकांत चव्हाण, अशोक माळी, संतोष मोगले, सुदर्शन यादव, प्रमोदकुमार म्हमाणे, भारत निकम, प्र।कार्यकारी संचालक रमेश गणेशकर, तसेच व इतर पदाधिकारी उपस्थित होते।
तसेच चिफ इंजिनिअर श्री गणपत घाडगे, चिफ केमिस्ट मोहन पवार, शेती अधिकारी रमेश पवार, सिव्हील इंजिनिअर मोरे, कार्यालयीन अधिक्षक दगडू फटे, स्टोअर किपर उत्तम भुसे, सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे, सर्व कर्मचारी उपस्थित होते।
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कामगार संघटनेचे अध्यक्ष विठठल गायकवाड यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करणेसाठी कारखान्यातील सर्व कामगारांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे आभार संचालक अशोक केदार यांनी मानले तर सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here