पक्ष विरोधी काम केल्यामुळे नॅशनल काँग्रेसच्या 38 नेत्यांची पदावरून हकालपट्टी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसला १८२ जागांपैकी फक्त १७ जागांवर विजय मिळवता आला. या लाजीरवाण्या पराभवानंतर काँग्रेस पक्ष आता अ‍ॅक्शन मोडवर आला आहे. काँग्रेसने पक्षाविरोधात काम करणाऱ्या ३८ नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले.

काँग्रेस नेते बाळूभाई पटेल म्हणाले, गुजरात विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या प्रदर्शनाबाबत मंथन सुरू आहे. या दरम्यान, आम्हाला ९५ जणांविरोधात पक्षविरोधी कारवाया केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात या महिन्याच्या सुरुवातीला दोन वेळा शिस्तपालन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर आम्ही ३८ नेते आणि कार्यकत्यांविरोधात कारवाई केली आहे.निलंबित केलेल्या ३८ नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या नेत्यांचाही समावेश आहे. सुरेंद्रनगरचे जिल्हाध्यक्ष हरेंद्र वालंद आणि नांदोडचे माजी आमदार पीडी वसावा यांना सुद्धा निलंबित करण्यात आले आहे. तसेच पक्षातील आठ नेत्यांना कारण दाखवा नोटी बजावली आहे.

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीत १८२ जागापैकी १५६ जागा जिंकत भाजपने दणदणीत विजय मिळवला होता. तर काँग्रेसला १७ जागा मिळाल्या होत्या. पहिल्यांदाच गुजरातमध्ये निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाला पाच जागा मिळाल्या होत्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here