कल्याण काळे यांच्या मध्यस्थीने विठ्ठल साखर कारखान्यावरील जप्तीच्या कार्यवाहीला स्थगिती

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

14 डिसेंबर ला राज्य बँकेचे अधिकारी येणार होते मालमत्ता जप्त करण्यासाठी

पंढरपूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत सापडलेला आहे कारखान्याकडे राज्य शिखर बँकेचे असलेल्या थकीत कर्जामुळे बँकेने जप्तीची कारवाई सुरू केली आहे.येत्या गुरुवारी14 डिसेंबरला राज्य बँकेचे अधिकारी कर्जपोटी राज्य बँकेकडे तारण असलेली विठ्ठलाची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी कारखाण्यावर येणार होते या दिवशी विठ्ठलच्या चेअरमन व संचालकांनी उपस्थित राहून मालमत्ता बँकेच्या ताब्यात देण्याची अंतिम नोटीस कारखान्याला दिली आहे. राज्य शिखर बँकेने कारखाना जप्त केला तर हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार होते त्यामुळे जप्तीची कार्यवाही टाळण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात मुंबई येथे झालेल्या बैठकीत सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे यांनी मध्यस्थी करून कारखान्यावरील जप्तीची कारवाई रद्द करून मुदत वाढ दयावी ही आग्रही भूमिका मांडली .

विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके सातत्याने पैसे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत दोन दिवसांपूर्वी पुणे येथे विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके व व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार आणि काही संचालकांची जप्तीची कार्यवाही च्या पार्श्वभूमीवर बैठक झाली या बैठकीत स्वतःच्या मालमत्ता गहाण ठेवून शेतकऱ्यांचे देणे देण्यासाठी पैसा उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत.राज्य बँकेचे थकीत कर्ज हप्ता व शेतकऱ्यांचे देणे देण्यासाठी पतपुरवठा करणाऱ्या फायनान्स कंपनीबरोबर बोलणं झालेल आहे पंधरा दिवसात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला शेतकऱ्यांचे व बँकेचे थकीत कर्ज हप्ता भरण्यासाठी पैसे उपलब्ध होत आहेत असे *भगीरथ भालके यांनी सांगितल्यानंतर सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याण काळे यांनी पुढाकार घेत बँकेचा कर्ज हप्ता भरण्यासाठी मुदत वाढ मिळावी यासाठी विठ्ठल साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार संचालक दिनकर पाटील विलास देठे समाधान काळे यांना सोबत घेऊन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. जप्तीच्या कारवाईला मुदतवाढ मिळावी अशी आग्रही भूमिका मांडली*.

थकीत कर्जापोटी कारखान्याची तारण असलेली मालमत्ता जप्त झाली तर पैसे उपलब्ध होण्याचे सर्व मार्ग बंद होऊन हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होईल त्यामुळे कारखान्याकडे असलेल्या कर्जफेडीसाठी मुदत वाढवून द्यावी हजारो शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तात्काळ निर्णय घ्यावा व जप्तीची कारवाई टाळण्यासाठी तात्काळ राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांना आदेश द्यावा अशी विनंती केली .

शिष्टमंडळाची बाजू ऐकून घेऊन *विठ्ठल सहकारी साखर कारखाना वरील जप्तीची कारवाई त्वरित थांबवावी व मुदतवाढ दयावी असे आदेश सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले फोन वरून राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांना दिले असल्याने विठ्ठल साखर कारखान्यावरील मालमत्ता जप्तीची कारवाही टळली आहे*.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भूमिका ही शेतकरी हिताचीच असून विठ्ठल कारखाना हा आर्थिक अडचणीतून बाहेर येऊन सुरू व्हावा अशीच आहे त्यामुळेच विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई सध्या टळली आहे.

भगीरथ भालके सातत्याने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे मात्र बँकेकडे कर्जापोटी तारण असलेला मालमत्ता जप्त झाली असती तर पैसे उपलब्ध होण्याचे सर्व मार्ग बंद झाले असते यामुळे हजारो शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन कल्याणराव काळे यांनी केलेल्या मध्यस्तीला यश आले असून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी तात्काळ जप्तीचे आदेश रद्द करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन तीन महिने मुदतवाढ देण्यास सांगितले आहे त्यामुळे तूर्तास विठ्ठल परिवार आणि विठ्ठल साखर कारखान्याला दिलासा मिळाला आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here