कर्मवीर भीमराव (दादा) महाडिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आज १ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम दादा चव्हाण, मा.युवराज भोसले, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील चव्हाण, या सर्व कार्यक्रमाचे संयोजक अक्षय गायकवाड, विश्वास बापू गायकवाड, संपादक प्रसाद कुलकर्णी, याचबरोबर या कार्यक्रमासाठी विकील दमन चव्हाण, सलमान मुजावर,आदी सर्व मान्यवर उपस्थित होते‌.
या कार्यक्रमा वेळी, शालेय विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व बाळ गंगाधर टिळक यांच्याबाबत आपली मनोगते व्यक्त केली. अनुक्रमे प्राची शिंदे, प्रणाली कांबळे, संजीवनी व्होनकळस, उमेश चव्हाण, भाग्यश्री राऊत या याचबरोबर अक्षय गायकवाड मित्रपरिवाराच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना शालेय बॅग वह्या पेन पेन्सिल चित्रकलेचे साहित्य, आदी , वाटप करण्यात आले.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक आर व्ही यादव,
सहशिक्षक डी.व्ही. श्री. डोंगरे, एम.एस. श्री. मोटे, पी.व्ही. श्री. गायकवाड, आर.एम. श्री. देशपांडे, बी.डी. श्री. बाबर, बी.एस. श्री. कोळेकर, बी. आर. श्री. शिंदे, टी.बी. श्री. जवळे, सहशिक्षक. व्ही.डी. श्रीमती चव्हाण, व्ही.एस. श्रीमती ऐडके आदी सर्व शिक्षक कर्मचारी वृंद या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here