कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त तालुक्यात 7 दिवस मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर : प्रणव परिचारक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त तालुक्यात 7 दिवस मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर : प्रणव परिचारक

कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील आठही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्येच रक्तदाब व मधुमेह तपासणी देखील होणार आहे. आज रविवारी भाळवणी पासून या शिबिराची सुरुवात होईल. पुढील सात दिवस हे शिबिर सुरू असल्याची माहिती युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली.

पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिचारक युवा मंच यांच्या वतीने आमदार प्रशांतरावजी परिचारक व उमेशराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरण निमित्त गतवर्षीपासून या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे शिबिर होणार आहे. यासाठी एच व्ही देसाई हॉस्पिटल हडपसर यांचे देखील सहकार्य लाभत आहे. या शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच लेन्स बसवून चष्म्यासह सुविधा दिल्या जाणार आहेत.

यामध्ये रविवारी 21 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र भाळवणी, सोमवारी 22 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र तुंगत, मंगळवारी 23 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे , बुधवारी 24 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गादेगाव , गुरुवारी 25 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डी आणि उंबरे , शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव तर शनिवारी 27 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पुळुज याठिकाणी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत शिबीर होणार आहे. हे शिबिर पांडुरंग परिवारातील युवक आघाडी व प्रणव परिचारक युवा मंच यांच्या माध्यमातून होत आहे.

गतवर्षीही कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अशी शिबिर घेण्यात आली होती. यामधून सुमारे 850 नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात आली. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांमध्ये डोळ्याच्या समस्या उद्भवतात. अशा रुग्णांसाठी हे शिबिर गतवर्षीपासून आधारभूत ठरत आहे. कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या सेवेच्या विचाराचा वारसा पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून अशा नेत्र तपासणी शिबिरातून अविरतपणे सुरू असल्याचा विश्वासही यावेळी प्रणव परिचारक यांनी व्यक्त केला

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here