“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे विद्यार्थ्यांना” मेंदूज्वर या “जपान तंत्राज्ञानीत” लसीचे लसीकरण संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आज शनिवार, दि.१५.०१.२०२२ रोजी कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेत ३ ते १५ वर्षे वयोगटातील सुमारे ६५३ विद्यार्थ्यांना शासनाचे आदेशानुसार जपान तंत्राज्ञान विकसित “मेंदूज्वर” या लसीचे लसीकरण कोरोनाचे नियम व अटी पाळत म्हणजे सॅनिटायझर, मास्क वापरणे व सोशल डिस्टंन्सींग सर्व नियम पाळत करण्यात आले. या लसीकरणानंतर सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

या विद्यार्थी लसीकरण मोहिमेचे आयोजन यशस्वी पार पाडल्याबद्द्ल संस्थेचे चेअरमन श्री रोहनजी परिचारक यांनी प्राचार्यांचे व त्यांच्या सर्व टिम्सचे कौतुक केले.
लसीकरणाचे वेळी प्रशालेच्या प्राचार्या सौ.सोनाली पवार, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके, सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी उस्त्फुर्त सहभाग घेतला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here