करमाळा तालुक्यातील केम येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक (राज्यपाल कोशारींचा निषेधार्थ केम कडकडीत बंद)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्राचे वाचाळवीर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या आक्षपार्ह विधानाचा निषेध म्हणून केम शहर बंद ठेवण्यात आले. केम मधील सर्व जाती धर्माचे बांधव सहभागी झाले होते. भविष्यात कोणत्याही महापुरुषांची अशी विटंबना होऊ नये यासाठी या राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी अध्यक्ष सागर राज तळेकर , अच्युत काका पाटील, महावीर आबा तळेकर,सागरराजे दोंड, प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर ओंकार जाधव,दिपक भिताडे, सचिन जाधव, राकेश धोंड, आदित्य तळेकर, रोहित तळेकर, बाळासाहेब गुरव यासह
केम मधील शिवशंभू भक्त व्यापारी,सर्व जाती धर्माच्या बांधव, नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित राहून सहभागी झाले होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here