करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रक्षिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रक्षिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.

करकंब येथे उद्या गुरुवार  ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रात्यक्षिक, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे यांचे आवाहन

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव पोलीस उपविभागीय अधिकारी पंढरपूर विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे व पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस विभागामार्फत ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा यंत्रणा सर्वोत्तम आपत्कालीन यंत्रणा राबवण्याचा संकल्प केला आहे.
या संकल्पनेतून करकब पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुवार दिनांक ३०/९/२०२१ रोजी सकाळी ९:३० वाजता सुवर्ण गार्डन हॉल मोडनिंब रोड करकंब येथे ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रात्यक्षिक या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमासाठी करकब पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या 27 गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य विविध पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते महिला पदाधिकारी व्यापारी सर्व पत्रकार यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here