करकंब जिल्हा परिषद गटात युवा नेते प्रणव परिचारक यांची वाढती या क्रेझ!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक व जिल्ह्याचे नेते अभ्यासू आमदार प्रशांत परिचारक यांचे करकंब जिल्हा परिषद गटासाठी मोठे योगदान

प्रतिनिधी – लक्ष्मण शिंदे 

गेल्या अनेक वर्षापासून परंपरागत आणि राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नवी पिढी निर्माण करून खेड्यापासून अगदी वाड्या-वस्त्या पासून तालुका पातळी ते जिल्हा पातळीपर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये पंढरपूर या तालुक्याच्या माध्यमाचे सातत्याने अखेरच्या श्वासापर्यंत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी गावपातळीवरील तालुका पातळीवरील असो अथवा जिल्हा पातळीवर असो एक समन्वयाची भूमिका घेऊन जिल्ह्यातच नव्हे परत राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला. त्याच अनुषंगाने जिल्ह्याचे नेते अभ्यासू आमदार प्रशांत परिचारक यांनीही ज्या त्या गावपातळीवरील विशेषता पंढरपूर तालुक्यातील करकंब जिल्हा परिषद गटाकडे कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात न्याय देण्याची भूमिका घेतल्याने गेल्या कित्येक वर्षापासून केवळ कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक व जिल्ह्याचे नेते अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक हाच ब्रांड पुष्पा या चित्रपटापेक्षा ही इथे फक्त परिचारक ब्रँड चालतो , हे गेल्या कित्येक वर्षापासून चालतो. असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. विशेष करून या करकंब जिल्हा परिषद गटात युवा नेते प्रणव परिचारक यांची क्रेझ ही वाढत चाललेली आहे, याला कारणही तसेच असल्याने कारण युवा नेते हे निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने नाही तर गेल्या कित्येक वर्षापासून करकंब जिल्हा परिषद गट व या तालुक्यातील जनता सर्व सामान्य वर्ग शेतकरी व्यापारी वर्ग विशेषता महिलावर्ग कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक व जिल्ह्याचे नेते अभ्यासू आमदार प्रशांत परिचारक व परिचारक निस्सिम पणे व निस्वार्थपणे विश्वास दाखवून या पंढरपूर तालुक्यात परिचारकच एक विश्वसनीय ब्रँड असल्याचे लोकातून बोलले जात असल्याने युवा नेते प्रणव परिचारक यांनीही कर्मयोगी श्रीमंतसुधाकरपंत परिचारक, जिल्ह्याचे नेते अभ्यासू आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंढरपूर तालुक्यातील ज्येष्ठ तसेच युवा नेते यांच्या सतत संपर्कातून यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब जिल्हा परिषद गट असो, वा पंढरपूर तालुक्यातील इतर गावातील कार्यकर्त्या बरोबरच गावागावातील नेते मंडळींशी चर्चा करून त्यांची भेट घेऊन प्रत्येकाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत असतात. हवेतून न चालणारा नेता म्हणून जमिनीवर चालणारे युवा नेते प्रणव परिचारक म्हणून नवी ओळख सध्या करकंब जिल्हा परिषद गटामध्ये निर्माण झाली आहे. यामुळे युवा नेते प्रणव परिचारक यांनी एक वेगळी क्रेझ निर्माण केल्यामुळे तळागळातील, सर्वसामान्यांचे, आपल्या जीवा भावातल्या कार्यकर्त्यांचे, शेतकरी विशेषता महिला वर्गातून युवा नेते प्रणव परिचारक यांना मिनी मंत्रालय अर्थात करकंब जिल्हा परिषद संधी दिल्यास या निश्चित पणाने विकासाच्या रूपाने कायापालट करतील अशी आशा करकंब जिल्हा परिषद गटात निर्माण झाली आहे.

कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांनी अगदी सुरुवातीच्या काळापासून पंढरपूर तालुक्यातील करकंब हे गाव मध्यवर्ती मानून त्याचे पालकत्व स्वतः स्वीकारले होते. त्यांच्या सोबतीला त्यावेळी स्वातंत्र सैनिक कै.माणिकचंद रावजी शहा,कै. नानासाहेब कानडे, कै. मारुती पाटील, कै. नरहर नागरस,कै. संदिपान देशमुख, कै. शंकरराव खुळे कै. महादेव तात्या मांजरे, कै. गणपत अप्पा झिरपे यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी साथ देऊन वाड्या-वस्त्या खेडोपाडी तालुका पासून ते जिल्हा पातळीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था असतील, सहकारी संस्था असतील या माध्यमातून एक कुटुंब प्रमुख म्हणून प्रमुख भूमिका बजावून कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांनी नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या काळात आजच्यापेक्षा प्रचंड गटातटाचे मोठ्या प्रमाणात राजकारण असायचे , तरीसुद्धा राजकारणाच्या पलीकडे जाऊन कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांनी भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे कै. कृष्णात भाऊ पुरवत यांच्याशी राजकारणाबरोबरच सामाजिक सलोखा राखून देवकते,शिंगटे, माने, बोचरे, खारे, मांजरे, पांढरे, प्रभाकर टेके, विश्वसनीय संस्था निर्माण करण्याचे काम केले.विशेष करून कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे नेते अभ्यासू आमदार प्रशांत परिचारक यांनी या करकंब जिल्हा परिषद गटांमध्ये सुरवातीच्या काळात त्यांच्या सोबत असणारे नरसा आप्पा देशमुख यांना पांडुरंग साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिले. त्यानंतर पटवर्धन कुरवली चे दिनकर भाऊ मोरे यांना सभापतिपद, करोळे येथील अर्चना व्हरगर, बार्डी दिनकर भाऊ कवडे यांनाही संचालक पदाची संधी दिली. विशेष करून करकंब ला सुधीर भाऊ झिरपे यांना तर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, संजय गांधी निराधार योजने समितीचे सदस्य अशा विविध पद देऊन याच करकंब जिल्हा परिषद गटातून सुमनताई नेहत्राव तसेच बाबुराव जाधव तसेच महिला बालकल्याण सभापती पद म्हणून रजनी देशमुख यांना सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अर्थात मिनी मंत्रालयात पदाची संधी प्राप्त करून दिली. मग पंचायत समितीच्या सभापतिपदी असो, पंचायत समिती सदस्य असो प्रत्येक वेळी जिल्ह्याचे नेते अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक यांनी करकंब जिल्हापरिषद गटासाठी नेहमीच झुकते माप आजपर्यंत दिलेली आहे. विशेष करून अभ्यासू आमदार प्रशांत परिचारक यांनी करकंब येथे करकंब च्या आर्थिक विकासाला आर्थिक चालना मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजारउप समिती मंजूर करून दिली आहे. जुन्या पिढीबरोबरच या भागातील युवकांचा कल ही सध्या युवा नेते प्रणव परिचारक यांची क्रेझ वाढत असल्याने पंढरपूर तालुक्यात परिचारकच हाच ब्रँड सर्वसामान्य लोकांच्या पुष्पा पेक्षा अधिक मनात रुजला आहे.आणि गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या निस्वार्थ असलेल्या विश्वासाने केलेल्या योगदानामुळे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल व चर्चेत येत आहे.

पूर्वीच्या आणि आताच्या राजकारणामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे . पंढरपूर तालुक्यातील विशेषता पंढरपूर चे कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांनी पद सत्ता आणि प्रतिष्ठा व राजकारण यापलीकडे जाऊन ही पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पक्षश्रेष्ठींना चर्चा करून मा. उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी मोकळा केला होता. कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांनी त्यावेळी केलेला त्याग हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही सध्याच्या होत असलेल्या राजकारणाला एक राज्यातआदर्श निर्माण केला आहे.

याच परिचारक पॅटर्न मुळे सध्या करकंब र्जिल्हा परिषद गटात युवा नेते प्रणव परिचारक यांच्या उमेदवारी कडे या करकंब जिल्हा परिषद गटातील शेतकरी, व तळागाळातील सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here