कमी कालावधीत श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे १ लाख क्रशिंग पूर्ण (कारखान्याची यशस्वी वाटचाल करून १२ लाख मे. टन ऊसाचे गाळप करण्याचे मा. संचालक मंडळाचा मानस आहे)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कमी कालावधीत श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे १ लाख क्रशिंग पूर्ण

(कारखान्याची यशस्वी वाटचाल करून १२ लाख मे. टन ऊसाचे गाळप करण्याचे मा. संचालक मंडळाचा मानस आहे)

 

 

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती दि. २१.०७.२०२२ रोजी मा. श्री अभिजीत पाटील साहेब यांची चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमन पदी मा. सौ. प्रेमलताताई रोंगे यांची बहुमताने निवड होवून मा. संचालक मंडळ अस्तित्वात आले. मा. चेअरमन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २ सिझन बंद असलेल्या कारखान्याचे कामकाज दि. २२.०७.२०२२ पासून चालू होऊन दि. २९.१०.२०२२ पासून अवघ्या ३ महिन्याच्या कालावधीमध्ये ऊस गळीत हंगाम २०२२-२३ चा शुभारंभ होऊन कारखाना चालू आहे. झालेला

कारखान्याचे चेअरमन मा. श्री अभिजीत पाटील साहेब यांनी कारखान्याच्या सभासदांचे मागील प्रलंबित ऊसाची बिले कारखाना चालू होण्यापूर्वी वाटप पूर्ण करून कारखान्यास देखभाल व दुरूस्तीसाठी लागणारे मटेरियल त्वरीत उपलब्ध करून, ऊस तोडणी वाहतुक यंत्रणाही थोडक्या कालावधीमध्ये उभारणी करून कारखान्याचा गळीत हंगाम व्यवस्थितरित्या चालू केला आहे. आज दि.१०.११.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता १ लाख क्रशिंग पूर्ण झालेले आहे. कमी कालावधीमध्ये १ लाख क्रशिंग झाल्यामुळे कारखान्याचे सभासद, कामगार, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार यांचेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असून कारखान्याचे चेअरमन मा. श्री अभिजीत (आबा) पाटील साहेब यांचेसह मा. संचालक मंडळाने यासवांचे अभिनंदन केले.

येथून पुढेही अशीच कारखान्याची यशस्वी वाटचाल करून १२ लाख मे. टन ऊसाचे गाळप करण्याचे मा. संचालक मंडळाचा मानस आहे. त्यासाठी सर्व सभासद शेतकरी यांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन मा. श्री अभिजीत पाटील साहेब यांनी केलेले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here