ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक;

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक;

(सोलापुरात मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा प्रयत्न)

सोलापूर // प्रतिनिधी

ओबीसी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी निष्काळजीपणा करणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष शहर व जिल्ह्याच्या वतीने सोलापूरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तो रोखला.

 या आंदोलनात आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यंनम, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सभागृह नेते शिवानंद पाटील, झेडपी सदस्य अरुण तोडकर, आनंद तानवडे, बिज्जू प्रधाने, अमर पुदाले, शंकर वाघमारे, के के पाटील, शशिकांत चव्हाण, प्रणव परिचारक, यांच्यासह शहर जिल्ह्यातील पदाधिकारी नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी होते. 

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले की,  राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे पाच जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींना वगळून निवडणुका हाेत आहेत. राज्य सरकारने सर्वाेच्च न्यायालयात वकील दिला असता तर ही वेळ आली नसती. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी महाआघाडी सरकारने वकीलच दिला नाही, असा आराेप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या आरोपावर उद्धव मुख्यमंत्री ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे. गेली सहा महिने महाआघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, अशी मागणी भाजपने करूनही दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here