ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत छावाच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाकडून कार्यवाही चालू

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत छावाच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाकडून कार्यवाही चालू

 

सोलापूर // प्रतिनिधी 

स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसीसाठी राजकीय आरक्षण ठेवू नये, अशी लेखी तक्रार छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी दि. 31/05/2021 रोजी निवडणूक आयोग, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे केली होती. सदरच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाकडून कार्यवाही चालू आहे. तसेच कालच सुप्रीम कोर्टाने निवडणूक पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आलेले आहे. तरी कुणबी-मराठ्यांनी जास्तीत जास्त ठिकाणी निवडणुका लढवून ग्रामीण व शहरी भागातील आपली ताकद दाखवून द्यावी. तसेच निवडणूक आयोगाने राजकीय दबावापोटी निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न केल्यास, त्या विरोधात मी स्वत: योगेश पवार हायकोर्ट आणि मा. सुप्रीम कोर्टात याचिका टाकणार आहे.

ओबीसी नेत्यांच्या मराठा विरोधी भूमिकेमुळे एके दिवशी ओबीसी आरक्षण धोक्यात येणार आहे.
आपलाच – योगेश (दत्ता) पवार

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here