ऊस दर संघर्ष समितीने आरटीओ कार्यालयात घेतले कोंडून!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ऊस दर संघर्ष समितीने सोलापूर जिल्हा आरटीओ कार्यालयामध्ये स्वतःला कोंडून घेतले आहे आरटीओचे अधिकारी कारवाईचा फारच करून कारखानदाराकडून आर्थिक हितसंबंध जोपासत मॅनेज झालेले आहेत याच्या निषेधार्थ ऊस दर संघर्ष समिती आक्रमक झालेले आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कक्ष क्रमांक 21 विजय किरण कर यांच्या कार्यालयामध्ये ऊस दर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्याने स्वतःला कोंडून घेऊन निष्क्रिय आरटीओ अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करायला सुरू केलेला आहे.

जोपर्यंत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांसमोर येणाऱ्या ऊस वाहतूक ट्रॅक्टर वर व नोंदणी नसलेल्या ट्रॅक्टर बैलगाडी बजेटवर कारवाई होत नाही तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही पोलीस बलाचा वापर केला आणि आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला तर ऊस दर संघर्ष समितीचे कार्यकर्ते टोकाचा निर्णय घेतील होणाऱ्या नुकसानीस आरटीओच्या प्रमुख गायकवाड मॅडम व सर्व त्यांची टीम जबाबदार असेल असे ऊस दर संघटनेचे समन्वयक संजय बाबा कोकाटे यांनी जाहीर केले आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here