उमेश दादा पाटील यांच्या पाठपुराव्यास यश! (सोलापूर जिल्ह्यातील रेशनिंगचा कोटा जवळजवळ ४०,००० ने वाढविला)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उमेश दादा पाटील यांच्या पाठपुराव्यास यश!

(सोलापूर जिल्ह्यातील रेशनिंगचा कोटा जवळजवळ ४०,००० ने वाढविला)

महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते कार्यकारी जिल्हाध्यक्ष तसेच नरखेड जिल्हा परिषद गटाचे सदस्य उमेश दादा पाटील यांनी मागील जवळजवळ सहा महिन्यापासून संपूर्ण मोहोळ तालुक्यातील गावं गाव पिंजून काढून तेथील सर्व नागरिकांच्या अडीअडचणी सोडवून करण्याचा प्रयत्न केला होता जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे अनेक मूलभूत प्रश्न चटकी सरशी सोडवले होते. त्यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ज्यांना रेशन कार्ड आहे पण धान्य मिळत नाही ही सर्वात मोठी तेथील ग्रामीण भागातील लोकांची समस्या होती त्यासाठी त्यांनी त्यावेळी तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेबांकडे पाठपुरावा करून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील रेशनिंगचा कोटा जवळजवळ चाळीस हजार ने वाढविला असून व मोहोळ तालुक्यातील ४०००, प्राप्त केला आहे. या शासन निर्णयामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये व मोहोळ तालुक्यामध्ये सर्व गोरगरीब जनतेमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून उमेश दादा पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आम्हास आता स्वस्त व चांगल्या दर्जाचे रेशन मिळेल अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागातील नागरिकांमधून मिळत आहेत.
जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक प्रश्न चुटकीसरशी सोडवून उमेश दादा पाटील यांनी सर्व मोहोळ तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य जनतेची मने जिंकली असल्याचे यावरून सिद्ध होते. यामध्ये त्यांनी सर्व मोहोळ व सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना सांगितले आहे की कार्ड असूनही रेशन मिळत नाही अशा लोकांनी सोबत दिलेल्या अर्जाप्रमाणे माहिती भरून रेशनकार्ड, झेरॉक्स जोडून, तहसीलदार मोहोळ यांच्या नावे अर्ज करावा. व सही व शिक्का व तारखेची पोज घ्यावी. असे आवाहन त्यावेळी उमेश दादा पाटील यांनी सर्वांना केले होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here