उमा महाविद्यालया मध्ये स्व.मा.आ. सुधाकरपंत परिचारक यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन संपन्न करण्यात आला.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उमा महाविद्यालया मध्ये स्व.मा.आ. सुधाकरपंत परिचारक यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन संपन्न करण्यात आला.


सोलापूर // प्रतिनिधी

श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त उमा शिक्षण संकुलामध्ये संस्थेचे विश्वस्त श्री.सी.एम. दोशीसर यांच्या हस्ते व उपाध्यक्ष श्री. मुकुंदराव परिचारक, सचिव श्री राजगोपाल भट्टड, विश्वस्त श्री. सुरेश आगावणे, श्री रमेश लाड, युवकनेते श्री प्रणव परिचारक यांच्या हस्ते उपस्थित प्रतिमापूजन करण्यात आले.

यावेळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रा.डॉ.बाड यांनी प्रस्ताविक मनोगत व्यक्त करताना स्व. कर्मयोगी ऋषितुल्य मा.आ. सुधाकरपंत परिचारक यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय इत्यादी कार्यक्रमाचा मागोवा घेऊन त्यांचा आदर्श घेऊन आपण मार्गक्रमण करावे हीच त्यांना खरी आदरांजली होईल तसेच सांगितले.

त्यानंतर दोन गाव मिनिटे उभे राहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक, प्राचार्य डॉ. विद्युलता पांढरे संकुलातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here