उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिलीप बापू धोत्रे यांनी घेतली भेट (प्रस्तावित पंढरपुरातील कॉरिडर प्रकल्प रद्द व्हावा अशी केली विनंती)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर शहरात होणाऱ्या कॉरिडॉर संदर्भात विविध मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांना आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत मनसे नेते दिलीप (बापू) धोत्रे यांनी निवेदन सादर केले आहे.

पंढरपूर शहरात होणाऱ्या काॅरीडाॅर मध्ये अनेक पिढ्यान पिढ्या व्यापार करणारे व्यापा-याचे दुकाने, पुरातन काळापासूनचे मंदीरे, कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती केली आहे.

यावेळी त्यांनी विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांचीही त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेऊन सर्व सविस्तर माहिती देऊन निवेदन सादर केले यावेळी दिलीप बापू धोत्रे यांच्याबरोबर सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील व त्यांचे सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here