उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, आवताडे, शुगर्स,च्या प्रथम गळीत हंगामाचा दि 04रोजी शुभारंभ! (कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार दि.4 नोव्हेंबर रोजी मंगळवेढा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली आहे.

दुपारी 12 वाजता आवताडे शुगर अँड डिस्टलरीजच्या प्रथम गळीत हंगामाचे मोळी पूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती चेअरमन संजय आवताडे यांनी दिली आहे.

 

यानंतर कारखाना स्थळावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात होत असला तरी आ.समाधान आवताडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मंगळवेढ्यात येऊन आ.आवताडे यांच्या कारखान्यात येणार असल्यामुळे या दौऱ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

पहिल्या टप्प्यात त्यांना संधी मिळेल, अशी सर्वांनाच आशा होती. पण, जिल्ह्यातील कोणालाच संधी मिळाली नसल्याने आता विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये भरघोस यश मिळवून पुढच्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार व दोन्ही खासदार पुन्हा विजयी होण्यासाठी मतदारसंघ विस्तारात कॅबिनेट किव्हा राज्यमंत्री मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here