उद्यापासून सर्व महाराष्ट्रात नवीन नियमावली जाहीर!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

राज्यात ओमायक्रॉनचा कहर सुरू झाल्याने पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात उद्यापासून कडक निर्बंध घालण्यात आले असून स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद, शाळा कॉलेजही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने, चित्रपटगृह, केश कर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे.

उद्या मध्यरात्रीपासून राज्‍यात नवे नियम लागू.

सकाळी ५ ते रात्री ११ राज्‍यात जमावबंदी लागू*

रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत राज्‍यात नाईट कर्फ्यू

मैदाने उद्‍याने पर्यटन स्‍थळे बंद राहणार

रेस्‍टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्‍के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू राहणार

२ डोस पूर्ण झालेल्‍यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येणार

राज्‍यातील शाळा आणि कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार

खासगी कंपन्यांमध्ये २ डोस घेतलेल्‍यांनाच परवानगी

खासगी कार्यालये ५० टक्‍के क्षमतेने सुरू राहतील

लग्‍नासाठी ५० तर अंत्‍यसंस्‍कारासाठी २० लोकांनाच परवानगी

हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

लग्‍न समारंभांसाठी ५० तर अंत्‍यसंस्‍कारासाठी २० लोकांनाच परवानगी

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here