उजनी जलवाहिनीचे टेंडर लक्ष्मी कंपनीला का दिले? दिलीप धोत्रे यांचा सवाल चौकशीची केली मागणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी उजनी दुहेरी जलवानीचे टेंडर 100 कोटी कमी भरणाऱ्या डीएनसी कंपनीला न देता केवळ 5 कोटी कमी भरण्याऱ्या लक्ष्मी कंपनीला दिले आहे. या प्रकारामध्ये काहीतरी गौडबंगाल आहे. या प्रकरणी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे.
नुकतेच उजनी दुहेरी जलवाहिनीचे टेंडर 635 कोटी रुपयांना लक्ष्मी कंपनीला देण्यात आले आहे. या टेंडरमध्ये डीएनसी कंपनीनेही सहभाग नोंदवला होता. मात्र त्यांना कोणत्याही विचारणा न करता टेंडर प्रक्रियेतून बाद करण्यात आले. उजनी जलवाहिनीचे टेंडर 640 कोटी रुपयांचे होते. डीएनसी कंपनीने सुमारे 100 कोटी रुपये कमी किंमतीचे टेंडर भरले होते. त्यांना मक्ता न देता केवळ पाच कोटी कमी भरणाऱ्या लक्ष्मी कंपनीला हे टेंडर का दिले, याबाबत शंका उपस्थित होत आहे. डीएनसी कंपनीला टेंडर दिले असते तर जनतेचे 100 कोटी रुपये वाचणार होते. त्या पैशातून डीएनसी कंपनीने शहरातील विकास कामे करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्मी कंपनीला टेंडर दिले आहे. यामध्ये लक्ष्मी कंपनी आणि अधिकाऱ्यांचे काहीतरी लागेबांधे असण्याचा संशय येत आहे. त्यामुळे या प्रकरणात सहभाग असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी दिलीप धोत्रे यांनी केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचेही धोत्रे यांनी सांगितले. लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही धोत्रे यांनी दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here