इंदापूरला उजनीचे पाणी देण्याचे नियोजन १७ वर्षापुर्वी ठरले होते

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

इंदापूरला उजनीचे पाणी देण्याचे नियोजन १७ वर्षापुर्वी ठरले होते

सोलापूर // प्रतिनिधी

भीमा उजनी प्रकल्पाच्या पाणी वापर फेरनियोजनात इंदापूरच्या लाकडी-निबोंडी उपसा सिंचन योजनेसाठी ०.९० टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती भीमा कालवा मंडळाचे सहायक अधीक्षक अभियंता यू. आर. जानराव यांनी दिली आहे.

सन २००४ मध्ये उजनी प्रकल्पास द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त देण्यात आली होती. या अहवालामध्ये लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी ०.९० टीएमसी म्हणजेच २५.४८४ दलघमी इतक्या पाणी वापराची तरतूद करण्यात आली होती. तसेच प्रवाही कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी ३२.१५ टीएमसी म्हणजेच ९१०.३३ दलघमी इतक्या पाणी वापराची तरतूद होती. सन २०१४ मध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. या योजनेसाठी २.०४ टीएमसी म्हणजेच ५७.७६३ दलघमी पाणी वापराची तरतूद करण्यात आलेली होती. सन २०१९ मध्ये उजनी प्रकल्पाच्या तृतीय सुधारित मान्यतेमध्ये लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी ०.९० टीएमसी २५.४८४ दलघमीऐवजी ०.५७ टीएमसी १६.१४० दलघमी व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी १.०१ टीएमसी २८.५९८ दलघमी तरतूद केली होती. तसेच प्रवाही कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी ३४.५१ टीएमसी म्हणजे ९७७.१५१ दलघमी इतक्या पाणी वापराची तरतूद हाेती.

आता असा केला बदल

उजनी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या भीमा, सीना व माण नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यामुळे उजनी प्रकल्पाच्या कालवा क्षेत्रातील लाभक्षेत्र आच्छादित होत आहे. बंधाऱ्यामुळे ज्या भागात नदीवरून सिंचन होत आहे, अशा आच्छादित क्षेत्राचा अभ्यास करून ६ ऑक्टोबर रोजी भीमा उजनी प्रकल्पाच्या उपलब्ध पाण्याचे फेरनियोजन करण्यात आले आहे.

नवीन नियोजनानुसार उजनी प्रकल्पाचा द्वितीय सुधारित मान्यता अहवालातील मान्यतेनुसार लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी ०.९० टीएमसी व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला शासनाने दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार २.०४ टीएमसी अशी तरतूद पुनर्स्थापित ठेवण्यात आलेली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here