आ. समाधान आवताडे यांनी भीमा पाटबंधारे अधिकाऱ्यांसमवेत घेतली आढावा बैठक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आ. समाधान आवताडे यांनी भीमा पाटबंधारे अधिकाऱ्यांसमवेत घेतली आढावा बैठक

 

भिमा पाठबंधारे विभाग अंतर्गत उपलब्ध पाण्याचा लाभ या लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना होण्यासाठी योग्य आणि आवश्यक कार्यवाही झाली पाहिजे. यासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ. समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली भीमा पाटबंधारे अधिकाऱ्यांची आढावा बैठक पंढरपूर येथे पार पडली.
याप्रसंगी आ. आवताडे यांनी सांगितले की, दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी पूर्ण केली आहे. परंतु गेल्या महीना – दीड महिन्यापासून वरुणराजाने उघडीक दिल्याने शेतकऱ्यांना उभी पिके जगविण्यासाठी पाण्याची खूप मोठी अडचण सतावत आहे.त्या अनुषंगाने आ.समाधान आवताडे यांनी बुधवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी पंढरपूर येथे आमदार जनसंपर्क कार्यालय येथे संबंधित आधिकारी व पदाधिकारी यांची बैठक आढावा घेत शेतकरी केंद्रबिंदू ठेवून आवश्यक ती पाऊले उचलण्याच्या सूचना केल्या.
सदर बैठकीत आ.समाधान आवताडे हे म्हणाले, उजनी लाभक्षेत्रातील एकही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही. यासाठी आपली यंत्रणा सज्ज करावी व त्यासाठी आवश्यक ती मदत लोकप्रतिनिधी म्हणून करण्यासाठी मी नेहमीच अग्रेसर असेन असे अभिवचन त्यांनी उपस्थित अधिकारी यांना दिले. त्याचबरोबर कॅनॉलमधील पाणी प्रवाहासाठी अडथळा निर्माण करणारी झाडे- झुडपे काढणे, कॅनॉल रहादारी रस्ते दुरुस्ती आदी विषय प्रामुख्याने व प्राधान्यक्रमाने मार्गी लावून पूर्णत्वास नेण्याचेही आ. समाधान आवताडे यांनी सांगितले.
सिंचित प्रकल्पाचे लाभ क्षेत्रामध्ये विहिरीवर सिंचित होणाऱ्या क्षेत्रास कालव्याद्वारे प्रवाही पद्धतीने पाणी लागत नसल्याने व सदरची क्षेत्र विहिरीच्या पाण्यावर सिंचित होत असल्याने सदर क्षेत्र उपरोक्त प्रकल्पाचे लाभ क्षेत्रांमधून वगळण्यास माझी हरकत नाही. ही अट त्या फॉर्म मधून वगळण्याच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकीस डी जे. कोंडेकर, एस.एन.चौगुले,एस.टी.काळूंगे टी.डी.कोळवले,एस.एस.पवार, एस.बी.पाटील व इतर भीमा पाटबंधारे व उजनी कालव्याचे आधिकारी, पदाधिकारी तसेच जिल्हा लेबर फेडरेशन संचालक सरोजभाई काझी, रयत क्रांतीचे दिपक भोसले, रामदास ढोणे,सुभाष ढेकळे – पाटील,अविनाश मोरे, पंढरपूर जनसंपर्क कार्यालय प्रमुख बालम मुलाणी, मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here