आ. बबनदादा शिंदे व रणजित भैया शिंदे, यांनी घेतले श्री सूर्यनारायण देवाचे दर्शन! विठ्ठलचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी नारायण चिंचोली गावाला दिली सदिच्छा भेट!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

संपूर्ण भारत देशामध्ये एकमेव असलेले तसेच महाराष्ट्रातील देवस्थान असलेले पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील सूर्यनारायण देवाची यात्रा नुकतीच नारायण चिंचोली येथे पार पडली.
या यात्रेमध्ये सर्व ग्रामस्थांनी विविध उपक्रम राबवून यात्रा यशस्वी करून दाखवली.
सर्व पंढरपूर तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी यावेळी श्री सूर्यनारायण मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे, यांनी सपत्नीक सूर्यनारायण देवाचे दर्शन घेतले.
यावेळी आमदार बबनदादा शिंदे गटाचे नेते बापूराव कोले यांनी सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे यांचा यथोचित सन्मान यावेळी केला. यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांनी इथून पुढे गावाच्या विकास कामामध्ये कुठल्या प्रकारचा निधी कमी न पडू देण्याची आश्वासन बापूराव कोले यांना दिले.

श्री सूर्यनारायण यात्रेनिमित्त आज नारायण चिंचोली मध्ये माढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बबनराव शिंदे व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय अभिजीत आबा पाटील व सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत भैय्या शिंदे जिल्हा परिषद सदस्य मा.सुभाषराव माने सर तुंगत गावचे नूतन सरपंच डॉक्टर आबासाहेब व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी सूर्यनारायणाच्या पूजेसाठी आले असता यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी लक्ष्मण तात्या कोल्हे, बापूराव कोल्हे, अभिजीत कवडे, दत्तात्रय कोले, संतोष चव्हाण,नवनाथ कोल्हे, अमित कोल्हे, शाहू मस्के, लहू दादा नलावडे, धनाजी पासले, हनुमंत गुंड, ज्योतीराम वसेकर, भीमराव कोल्हे, अजय देशमुख, मेजर संदीप कोल्हे, श्रीकांत नलावडे, साजन माने,सुनील माने, श्रीकांत चव्हाण, अनिल चव्हाण, रयतेचा राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भैया गुंड, आप्पा गुंड, उमेश दाढे,व.रयतेचा राजा प्रतिष्ठान, विठ्ठल परिवार व बबनदादा शिंदे मित्रपरिवार समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here