आ.बबनदादा शिंदे यांच्या वतीने ५० हजार ऊसतोडणी कामगारांना फराळाचे वाटप! ५० हजार ऊसतोडणी कामगारांना २० टन बुंदीचे लाडू व १० टन चिबड्याचे केले वाटप!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विठ्ठलराव शिंदे सह साखर कारखाना पिंपळनेर येथील ५०००० ऊस तोड मजुरांना दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रत्येकी ५ किलो बुंदीचे मोतीचुर लाडू व ३ किलो चिवडा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व विकासप्रीय आमदार मा.श्री.बबनरावजी दादा शिंदे व सौ.सुनंदाताई बबनराव शिंदे(वाहिणी) यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.

मराठवाडा,विदर्भातील विविध प्रांतातून हे ऊस तोडणी कामगार साखर कारखान्याकडे ऊस तोडणीसाठी येतात.दिवाळी पूर्वीच १५ ते २० दिवस अगोदरच हे ऊसतोड कामगार आपली घरं-दारं सोडून आपली उपजीविका भागवण्या करिता ऊस तोडणीसाठी येत असतात.त्यामुळे या सर्व कामगारांना ‘दिवाळी’ साजरी करणे शक्य होत नाही.या सर्व बाबींचा विचार करून ज्याप्रमाणे शेतकरी सभासदांना उसाला उच्चांकी दर देऊन तसेच कामगारांना बक्षीस,बोनस पगार,व वेतनवाढ देऊन खुश केले,आनंदी केले,अगदी त्याच प्रमाणे आपल्या कारखान्यावर ऊस तोडणी करीता आलेल्या या कामगारांची दिवाळी गोड व्हावी,त्यांचे आनंदात सहभागी व्हावं या उद्देशाने ५० हजार कामगारांना २० टन बुंदीचे लाडू व १० टन चिवडा आदरणीय आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडुन वाटप करण्यात आला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here