आ. प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपियन शुगर्स येथे रक्तदान शिबिर संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपियन शुगर्स येथे रक्तदान शिबिर संपन्न

       पंढरपूर:सोलापूर जिल्ह्याचे आमदार व युटोपियन शुगर्स चे मार्गदर्शक प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त वार सोमवार  दि. ३०/०८/२०२१ रोजी युटोपियन शुगर्स लि. कचरेवाडी ता.मंगळवेढा येथे पंढरपूर ब्लड बँक व युटोपियन शुगर्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.समाधान दादा अवताडे व पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी भा.ज.पा.जिल्हा संघ सरचिटणीस शशिकांत चव्हाण  युटोपियन शुगर्स चे सर्व अधिकारी,खाते-प्रमुख,व कर्मचारी उपस्थित होते.सदर च्या शिबिरात ७० रक्त दात्यांनी सहभाग घेतला होता. कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर स्वछ वातावरणात, व गर्दी टाळत सोशल डिस्टिंग्शनचे पालन करीत या शिबिराचे आयोजन केले होते.

       यावेळी बोलताना समाधान आवताडे म्हणाले की,सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्‍या युटोपियन शुगर्सद्वारे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. रक्त दान हे श्रेष्ठ दान आहे.कोरोंना मुळे नियमित चालणार्‍या रक्त दान शिबिरांना फटका बसला असल्याने अशा प्रकारचे शिबीर आयोजित करणे हे कौतुकास्पद आहे.सदर प्रसंगी जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांना दीर्घायुष्य लाभावे अशी मी श्री.रुक्मिणी-पांडुरंग व श्री. संत दामाजी यांच्या चरणी प्रार्थना करतो व शुभेच्छा देतो.तसेच उपस्थित रक्त-दात्यांचे आभार मानतो.यावेळी रक्तदान केलेल्या व्यक्तींना अल्पोपहार तसेच पॉवर बँक भेट म्हणून देण्यात आल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here