आ. प्रणिती शिंदे यांच्या वतीने समाजकल्याण विभागामार्फत असलेल्या विविध योजनांचा, महामंडळे व रमाई आवास योजनेचे पाथरुट चौक मातंग वस्ती येथे मार्गदर्शन शिबिर संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आ. प्रणिती शिंदे यांचे आवाहन

 

आज रोजी आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, व इतर महामंडळ आणि मागासवर्गीयांसाठी समाजकल्याण विभागामार्फत असलेल्या योजनांचा तसेच रमाई आवास योजनांचे मार्गदर्शन शिबीर पाथरूठ चौक मातंग वस्ती येथे आयोजित केले होते.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, शासन मागासवर्गीयांसाठी अनेक योजना आखत असते पण त्या योजना लोकांपर्यंत पोचत नाहीत म्हणून आम्ही समाजकल्याण विभाग, महामंडळे, रमाई आवास योजना आदी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत, युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे सर्व योजना शिबिराच्या माध्यमातून आपल्या दारापर्यंत पोहोचवत आहोत त्यांचा जास्तीत जास्त युवकांनी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी काही अडचणी येत असतील तर त्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

यावेळी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक युवकांचे, नागरिकांचे अर्ज ही भरून घेण्यात आले.

या वेळी समाज कल्याण बार्टी नोडल अधिकारी सोनकांबळे मॅडम, व अश्विनी सुपाते मॅडम, समता दूत कारंजे साहेब, सिटी इंजिनिअर सो म पा पुजारी साहेब, समाज कल्याण अधिकारी चाबुकस्वार साहेब, संत रोहिदास महामंडळाचे लंकेश्वर साहेब, महात्मा फुले महामंडळाचे प्रशांत तेलंग साहेब, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे जगधने साहेब, महापालिकेचे गणेश कोळी, UCD विभाग, सोलापूर महापालिकेचे अधिकारी वर्ग यांनी उपस्थित नागरिकांना व युवकांना विविध योजनांची व रमाई आवास योजनेची माहिती दिली. मार्गदर्शन केले.

या वेळी राम बोराडे, भोलानाथ साबळे, संजय साठे, अनिल साठे, संभाजी डुकरे, राजू क्षीरसागर, लखन गायकवाड, बाळू गायकवाड, शांतीलाल साबळे, गणेश शिंदे, विशाल जाधव, खंडू बनसोडे, अनिल बनसोडे, सतीश बागडे, शीतल कांबळे, राधाबाई सुरवसे, आदी महिला व नागरिक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here