आमदार, नगरसेवक आमच्या घरी, निवडणुका असो वा नसो,आम्ही जनतेचे कामे करणार : प्रणिती शिंदे सोलापूरातील जूना प्रभाग क्र. 22 रामवाड़ी येथे गणेश डोंगरे आयोजित “हात से हात जोडो अभियान” कार्यक्रम संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर शहरातील जूना प्रभाग क्रमांक 22 पोगुल मळा,रामवाडी येथे “हात से हात जोडो” अभियानाची महत्वाची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आयोजित केली होती या कार्यक्रमास मोठ्ठा प्रतिसाद मिळाला.

यावेळी बोलताना आ. प्रणिती शिंदे म्हणाले की, रामवाड़ी व आजु बाजू परिसरातील नागरिक बंधु भगिनींच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी तिसऱ्यांदा आमदार झाले. माझे आणि तुमचे आमदार आणि मतदाराचे नाते नसुन एक आई आणि मुलीचे नाते आहे. आमदार, नगरसेवक आमच्या घरी, निवडणुका असो वा नसो आम्ही कायमच तळागाळातील जनतेचे कोणतेही काम असो करत राहणार, त्यांच्या हितासाठी काम करणार, आत्ता या भागातील पाणी प्रश्ना बाबत गणेश डोंगरे यांनी सांगितले ते ही लवकरच सोडविनार आहे. असे बोलताना आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here