आमची सत्ता येताच कारखान्याचे सभासदत्व खुले करणार:शिवानंद पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आमची सत्ता येताच कारखान्याचे सभासदत्व खुले करणार:शिवानंद पाटील

दामाजी सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे. दामाजी’चा राजा फक्त सभासद शेतकरीच आहेत. सत्ताधाऱ्यांनी १९ हजार ५०० सभासद वगळण्याच्या नोटिसा दिल्या,

मृत सभासदांच्या वारसदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे घाणेरडे राजकारण केले आहे. कदापिही दामाजीचा स्वाभिमानी सभासद विसरणार नाही.

सत्तेत आले की दामाजीचे सभासदस्तव खुले ठेवणार. सर्वांना मतदानाचा हक्क मिळवून देणार आहे. कर्जमुक्तीच्या वल्गना करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी कारखाना २०० कोटीच्या कर्जाच्या खाईत लोटला असल्याचा घणाघात समविचारी आघाडी पॅनलचे शिवानंद पाटील यांनी व्यक्त केला.

समविचारी आघाडी पॅनलच्या धर्मगांव , ढवळस , मल्लेवाडी , देगांव , घ रनिकी , मारापूर , गुंजेगांव , महमदाबाद शे . लक्ष्मी दहिवडी , आंधळगांव , गणेश वाडी , शेलेवाडी , अकोला , कचरेवाडी या गावात प्रचार सभा झाल्या यामध्ये ते बोलत होते.

अॅड नंदकुमार पवार, दामोदर देशमुख, अजित जगताप, प्रकाश गायकवाड, युन्नूस शेख, पी.बी. पाटील, औदुंबर वाडदेकर , शशिकांत बुगडे , भिवा दोलतोडे , तानाजी काकडे , बसवराज पाटील , गौडाप्पा बिराजदार आप्पासाहेब चोपडे , तानाजी खरात , कल्याण रोकडे, दादा गरंडे, अशोक चौडे भारत पाटील , दादा दोलतोडे , अशोक चौडे शिवाजीराव नागणे , पांडुरंग भाकरे , दिगंबर भाकरे , महादेव लुगडे , दिनकर यादव , हरी यादव आदी उपस्थित होते.

दामाजीचे संस्थपक चेअरमन कै . कि . रा . मर्दा वकील , कै रतनचंद शहा , कै चरणुकाका पाटील यांनी दामाजी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी खते , बेणे , ड्रीप यासह विविध योजना राबविल्या.

सभासद शेतकऱ्यांना सुख दुःखात कारखान्यातुन आर्थिक मदतीचा हात दिला . मात्र सत्ताधाऱ्यांनी निवडून येण्यापूर्वी जो १९ कलमी जाहीरनामातील १८ आश्वासने पूर्ण केली नाहीत.

बऱ्याच संचालकांना स्वतः लाच न्याय मिळाला नाही ते सभासदाला काय देणार तोडणीची अपुरी यंत्रणा भरल्याने शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यास घालवताना मोठी हेळसांड झाली.

शेतकऱ्यांची आर्थिक लूटमार सुरू झाली. ऊसतोडणीसाठी एकरी तब्बल १० ते १२ हजार रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागला शेतातला ऊस वेळेवर गाळपाला जाणार नाही.

या भीतीपोटी अक्षरश काही शेतकऱ्यांना ऊस पेटवून घालण्याची दुर्दैवी वेळ आली सभासदांच्या या सर्व हाल अपेष्टाना जबाबदार असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सभासदाचा मोठा संताप व आक्रोश आहे.

तो मतपेटीतून व्यक्त करतील. 27 सहकारी साखर कारखाना सहा वर्षे ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांनी शेतकरी सभासद व कामगारांचे आर्थिक शोषण केले आहे. ते थांबवण्यासाठीच आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत.

सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव दिला नाही सहा सहा महिने ऊस बिलासाठी झुलवत ठेवले. तसेच कारखाना कामगारांना वेतन आयोगानुसार पगार दिला जात नाही.

गेली अनेक वर्षांपासून दिवाळी बोनस नाही, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कपात करून सरकारकडे वेळेवर भरली जात नाही. गेल्या काही महिन्यांपासून कामगारांना वेतन दिलेले नाही. अशा प्रकारे कामगार व शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण चालू आहे.

या बाबत कोणीतरी जाब विचारणे गरजेचे होते , त्यासाठीच समविचारी आघाडीच्या माध्यमातून सर्वजण निवडणूक लढतो आहे.

सभासद निश्चित आमच्याबरोबर राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परिवर्तन करण्यासाठी सर्वजण एकजुटीने निवडणूक रिंगणात उतरले.

सभासदांना हवे असे सक्षम पॅनल तयार झाले. शेतकऱ्यांच्या हितासाठी व चुकीच्या कारभाराला विरोध करण्यासाठी निवडणूक रणांगणात उतरलो आसून समविचारी पॅनलचा विक्रमी मतांनी विजयी होणार, असा निर्धार झेडपीचे माजी सभापती शिवानंद पाटील यानी व्यक्त केला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here