आदी चंद्रभागेतील पाणी स्वच्छ करा. मग भारतरत्न लता दीदींच्या अस्थी आणा?

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

गणेश अंकुशराव यांचा प्रशासनाला इशारा!

पंढरपूर प्रतिनिधी- आदी चंद्रभागा नदी स्वच्छ करा मग भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता दीदींच्या अस्थी पंढरीच्या चंद्रभागेत विसर्जन करण्यासाठी आणा असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी प्रशासनाला दिला आहे. 

भारतरत्न लता मंगेशकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी देशभरातून सामाजिक, राजकीय, कलाकार, त्याच बरोबर सर्वच क्षेत्रातील मान्यवर आले होते. पण आता लता दीदींच्या अस्थी पंढरीच्या चंद्रभागेत विसर्जन करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली म्हणून आम्ही आज लता दीदींना श्रध्दांजली वाहून त्यांच्या अस्थी या दुषीत झालेल्या चंद्रभागेत विसर्जन करू नये यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत असं गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे.

आताच माघी वारी झाली त्यावेळी ही चंद्रभागेतील पाणी स्वच्छ करण्यात आली नाही. नदीत पाणी सोडले नाही. 3 लाख भाविक भक्त पंढरपूरात आले होते त्यांनी ही चंद्रभागा नदी मध्ये पाणी नसल्याची व घाणीचे साम्राज्य असल्याची खंत व्यक्त केली. 

 गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागा नदीचे पाणी चेक करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवले असता प्रयोगशाळेचा अहवाल पाणी दुषित असल्याचा आला तरी हे पाणी पिण्यास आयोग्य आहे. पण लाखो वारकरी हे पाणी तिर्थ म्हणून पितात त्यात कित्येक वारकरी आजारी पडण्याची शक्यता आहे. याला जबाबदार कोण असा सवाल गणेश अंकुशराव यांनी केला आहे.

यामुळे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थी दुषित झालेल्या चंद्रभागा नदीत विसर्जित करू नये असं गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे. याप्रसंगी चंद्रभागा नदी परिसरातील वासुदेव मंडळी, सुरज कांबळे, प्रताप अधटराव, श्रीनिवास उपळकर, गणेश कोळी, सचिन नेहतराव, सुहास कोळी, बापूराव व्यवहारे, नवनाथ परचंडे, तात्या अधटराव, मनोज कोरे, आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here