आण्णांचे फोटो बुटाने तुडणाऱ्यांना मते मागण्याचा अधिकार नाही भाळवणी येथील प्रचार सभेत अमरजीत पाटलांचा घनाघात

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आण्णांचे फोटो बुटाने तुडणाऱ्यांना मते मागण्याचा अधिकार नाही

भाळवणी येथील प्रचार सभेत अमरजीत पाटलांचा घनाघात

ज्या कर्मवीर अण्णांनी विठ्ठलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे संसार फुलवले त्या अण्णांचे कारखान्यातील फोटो बूटाने तुडवणाऱ्यांना आज त्यांच्या फोटोला हार घालून अण्णांच्या नावाने मते मागताना लाजा वाटत नाहीत का? असा घनाघात अमरजीत पाटील यांनी कल्याणराव काळे यांचे नाव न घेता केला
ते भाळवणी येथील अण्णाभाऊ शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचार सभेत
बोलत होते

आमचे वाडवडील प्रामाणिक होते. त्यांनी स्वतः आणि त्यांच्या पश्चात आम्ही वारसदारांनी संस्थेचा पैसा वैयक्तिक स्वार्थाकरता वापरला नाही. आमचे बापजादे प्रामाणिक होते म्हणून त्यांचे नाव अभिमानाने घेतो. तुमचे तसे आहे काय ? आमच्या प्रमाणेच तुम्ही सुद्धा शिवतीर्थावर येऊन छातीवर हात ठेवून असे सांगणार का ? असा सवाल भगीरथ भालके यांना केला.

चौकट
अण्णांची कारखान्यावरची सत्ता गेल्यानंतर कल्याणराव व त्यांचे सहकाऱ्यांनी अण्णांच्या बंगल्याची लाईट पाणी बंद केले. कल्याणराव काळे यांनी विजयाच्या उन्मादात अण्णांचे फोटो जमिनवर टाकून बुटाणे तुडवले आणि हे चित्र स्वतःच्या डोळ्याने बघणारे सभासदांनी कामगार यांनीच आता ही निवडणूक हातात घेतली आहे.. असे एका जुन्या कामगाराने खाजगीत बोलून दाखवले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here