आठ दिवसात स्मशानभूमीतील कामे न केल्यास ग्रामपंचायतीस ठोकणार टाळे – मनसे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

करकंब स्मशानभूमीतील गैरसोयी बद्दल ग्रामपंचायतीला वारंवार निवेदने देऊनही कुठलीही कामे केली जात नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ईशारा दिला आहे.
करकंब हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव आहे त्यामुळे करकंबमध्ये जन्म मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. करकंब येथील स्मशानभूमी मध्ये मोठ्या प्रमाणात बाभळी व इतर झाडाझुडपांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अंत्यविधी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना त्यामुळे प्रेतास दहन देताना खूपच अडचणी येत आहेत. स्मशानभूमीमध्ये एक बोअरवेल घेण्यात आलेले आहे परंतु त्या बोअरवेलला विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा नादुरुस्त असल्याने प्रेतास धन देण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही बऱ्याच वेळा हे बोअर बंद असल्याने अंत्यविधी करण्यास गेलेल्या नागरिकांना आंघोळ करण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागते किंवा घागरीने पाणी आणून क्रियाकर्म करावे लागते. स्मशानभूमी मध्ये लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या सोलर पॅनलची ही दुरावस्था झालेली दिसून येते. मृत्यूनंतर मानवाची सर्व हाल-अपेष्टा, दुःख यातून सुटका होते म्हणतात पण मृत्यूनंतरही करकंब समशानभूमीत गेल्यानंतरही ना त्या प्रेताची सुटका होते ना संबंधित नातेवाईक व नागरिकांची सुटका होते यापूर्वी २२.३.२०२१ रोजी मनसेतर्फे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांना यांसंबंधी लेखी निवेदन दिले होते परंतु संबंधितांनी या प्रकरणी स्मशानभूमी मध्ये कोणतीही सुधारणा केलेली नाही.
येथून पुढे तरी स्मशानभूमीतील बाभळी व इतर झाडे झुडपे काढावीत, बोअरवेलला करण्यात येणारा विद्युत पुरवठा सुरळीत करावा, सोलर पॅनल दुरुस्त करण्यात यावा संबंधित व्यक्तीस जिवंतपणी नाही तर मृत्यूनंतर तरी शांती मिळावी यासाठी संबंधित पदाधिकारी याची दखल घेतील असे नागरिकांकडून बोलले जात आहे या तक्रारीची गंभीरपणे दखल घेतली गेली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने ग्रामपंचायत समोर आंदोलन करून, ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
करकंब स्मशानभूमीतील विविध गैरसोयीबद्दल मनसे शाखा करकंब यांचेतर्फे गटविकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here