आई तुळजाभवानी दर्शनच्या चरणी प्रार्थना (मा राजसाहेब ठाकरे, यांना दीर्घायुष्य लाभो अशी श्री आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना: बाळा नांदगावकर )

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे यांच्या येणाऱ्या 14 जून रोजी च्या वाढदिवसानिमित्त राज साहेबांना दीर्घायुष्य लाभो यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर ,मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी आज तुळजापूर आई तुळजाभवानी ची विधिवत पूजा करून आई चरणी प्रार्थना केली..

येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे, बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, सगळ्यांचे कल्याण होऊ दे, यासाठी आई जगदंबे चरणी प्रार्थना केली साकडे घातले..
यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे ,सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर,जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे ,सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख ,संभाजीनगर महानगर प्रमुख बिपीन नाईक,जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनसेचे धाराशिव जिल्हा संघटक अमर राजे कदम, जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, आबासाहेब ढवळे ,राजेंद्र गपाट,शाहूंराज माने,पाशा शेख, बाळासाहेब कोठावळे, दादा कांबळे ,महेश जाधव, विद्यार्थी सेनेचे निलेश जाधव. जलाल भाई शेख आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here