आंबेडकर जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम, एक रुपया प्रति लिटरप्रमाणे पेट्रोलचं वाटप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात अनोखा उपक्रम राबवण्यात आला. पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले असताना केवळ एक रुपया प्रति लिटर प्रमाणे पेट्रोलचं वाटप करण्यात आले. सोलापुरातल्या डॉ. आंबेडकर स्टुडन्टस आणि युथ पँथर्स या संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. सोलापुरात आज पेट्रोलचा दर 120.18 रुपये आहे.

सध्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पेट्रोलचे दर हे 120 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाचशे नागरिकांना एक रुपयाप्रमाणे पेट्रोल देत बाबासाहेबांना अभिवादन करत असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली. अवघ्या एक रुपयात पेट्रोल मिळत असल्याने नागरिकांची तुंबड गर्दी पेट्रोल पंपावर झाली होती. भली मोठी रांग यावेळी पेट्रोल पंपाच्या समोर दिसून आली. मात्र यातील पाचशे नागरिकांना प्रति एक लिटर प्रमाणे पेट्रोल वाटप संघटनेच्यावतीने करण्यात आले. 

दरम्यान महागाई वाढलेली असताना आमच्यासारखी छोटी संघटना पाचशे लोकांना पेट्रोल वाटप करुन दिलासा देऊ शकते तर सरकारने देखील नागरिकांना दिलासा द्यावा, असा देण्याचा उद्देश या उपक्रमामागचा असल्याची भावना डॉ. आंबेडकर स्टुडन्टस आणि युथ पँथर्स संघटनेचे अध्यक्ष महेश सर्वगोड यांनी व्यक्त केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here