आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिनाच्या निमित्ताने तृतीय पंथीयासाठी मतदार नोंदणीच्या विशेष शिबिरांचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सेालापूर:-दिनांक ३१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने दि २७ मार्च ते २ एप्रिल २०२२ हा कालावधी तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह म्हणून साजरा करण्याचा निर्णय मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने घेतलेला असून जिल्ह्यामध्ये पुरेश्या प्रमाणात विविध माध्यमाद्वारे तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीच्या विशेष शिबीर आयोजन करण्यात येत आहे.

त्याअनुषगाने तृतीयपंथी मतदाराचा शोध घेऊन त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुढील प्रमाणे नमूद ठिकाणी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. 1)करमाळा , माढा, बार्शी, मोहोळ, अक्क्लकोट, पंढरपूर, मंगळवेढा सांगोला व माळशिरस-संबंधित तहसिल कार्यालय   2)उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर- निर्मय आरोग्य धाम, 15/C, पेशंट असोशिएट बिल्डींग, सरस्वती बुक डेपोच्या पाठीमागे, गोल्डफिंच पेठ, नवी पेठ सोलापूर

मतदारांना आवाहन मी मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर व भारत वाघमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर यांचेमार्फत तृतीय पंथीय नागरिकांना आव्हान करण्यात येते की, दि. 1 जानेवारी २०२२ रोजी ज्या तृतीयपंथीय नागरिकांचे वय १८ वर्ष पूर्ण झालेले आहे, परंतु त्यांनी अद्याप मतदार यादीमध्ये नाव नोंदणी केलेली नाही अश्या सर्व नागरिकांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणेसाठी दि. ३० मार्च, २०२२ रोजी संबंधित तालुक्याच्या तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून या संधीचा लाभ घेवून मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा निवडणुक अधिकारी मिलींद शंभरकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here