अवघ्या 10 दिवसात त्याने बोललेला शब्द खरा केला! (“या” युवकांची महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीत चर्चा) (“मातब्बरांना जमले नाही ते त्यांनी करून दाखवले”)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अवघ्या 10 दिवसात त्याने बोललेला शब्द खरा केला!

(“या” युवकांची महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीत चर्चा)

मातब्बरांना जमले नाही ते त्यांनी करून दाखवले

विश्वराज धनंजय महाडिक चेअरमन भीमा सहकारी साखर कारखाना हे नाव कदाचित तुम्ही पहिल्यांदाच वर्तमानपत्राच्या किंवा चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा ऐकले असेल, माझ्या माहितीप्रमाणे व अनुभवाप्रमाणे या व्यक्तीचा माझा जो ०२ ते ०३ वर्षांपूर्वी संपर्क झाला.
आम्ही पेशाने पत्रकार असलो तरी, जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते मंडळी मंत्री खासदार आमदार नगरसेवक सरपंच ग्रामपंचायतीचा सदस्य, या सर्वांशीच आमचे तालुक्याचे संबंध असतात.
पण माझी भेट झाल्यानंतर विश्वराज धनंजय महाडिक हे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहेत हे मला माहिती झाले

त्यांची बोलण्याची कला काम करण्याची पद्धत सर्व थोरा- मोठ्यांमध्ये मिळून मिसळून सर्वांना आपलेसे करून घेऊन काम करून घेण्याची कसब,
त्याचबरोबर सर्वच ज्येष्ठ मंडळींना वाकून नमस्कार करण्याची पद्धत या सर्वांमुळे आम्ही पत्रकार असलो तरी त्यांचे एकच मिनिटात , फॅन झालो आहे. आजवर खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत प्रत्येक वेळी काम करताना जो आम्हाला आधार मिळाला जी मदत मिळाली, व आम्हाला शाब्बासकी मिळाली तशी शाब्बासकी विश्वराज भैय्या महाडिक यांच्याकडूनही मागच्या महिन्यात पार पडलेल्या भिमा कारखान्याच्या निवडणुकीत मिळाली.

ज्यावेळेस पहिल्यांदा आमची भेट झाली त्यावेळेस माझ्या सहकाऱ्यांना मी सांगितले की (“साहेबांच्या मुलांमध्ये एक प्रकारचे स्पार्क आहे बर का”)
या झाल्या सर्व अनुभवातल्या गोष्टी पण त्यांनी दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजी भीमा सहकारी साखर कारखान्याची चेअरमन पदाची धुरा घेतल्यानंतर फक्त अवघ्या १० दिवसांमध्ये कारखान्याच्या व्यवस्थापनाला चांगल्या पद्धतीने हाताळून व कारखान्याच्या कामगारांकडून अतिशय प्रेमाने व आपुलकीने काम करून घेऊन १००००० मेट्रिक टन इतके उसाचे गाळप केल्याचा रेकॉर्ड या नवतरुण चेअरमन वरती महाराष्ट्रात नोंदला गेला आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्याचा १००००० मेट्रिक टन, गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करताना विश्वराज (भैय्या) महाडिक यांनी अक्षर:शा डोळ्यात तेल घालून, जेवणाला वेळ मिळत नव्हता म्हणून अक्षरशः वडा-पाव खाऊन व सर्व कामगारांच्या सोबत डब्यात जेवण करून हे १०००० गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
त्याचबरोबर को-जन प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या पद्धतीने वीज निर्मिती केली असल्याची ‌माहिती समजत आहे. व मोठ्या प्रमाणात वीज निर्यात होत असल्याची माहिती मिळाली आहे.

ज्या भीमा कारखान्याच्या दराबाबत व काट्याबाबत* “भिमाच्या” निवडणुकीमध्ये, विरोधकांनी मोठ्या पद्धतीने चुकीचे राळ उठवली. व व अनेक धांद्रांत व खोटे आरोप केले.
सर्व सभासद शेतकऱ्यांना व कामगारांना भूलथापा मारल्या.

त्या सर्वांना एका 26 वर्षाच्या नवयुवकाने कोल्हापुरी चपराक मोठ्या प्रमाणात मारली असल्याचे यावरून दिसते आहे.

“वारसाने फक्त संधी मिळते,कर्तुत्व हे सिध्द करावच लागत” असे चेअरमन विश्वराज भैय्या महाडिक यांनी आपल्या भाषणात सांगितले होते ते खरे असून कुठल्याही कामांमध्ये स्वतःचे स्वतः कर्तृत्व सिद्ध करावे लागते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

विश्वराज भैय्या महाडिक, हे वादळ,न थांबणारे आहे.
१०६२९ मतांची परतफेड विश्वराज भैय्या महाडिक लवकरच करतील, असा विश्वास कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व ज्येष्ठ कनिष्ठ सभासद शेतकऱ्यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here