अल्पसंख्याक शाळांना सुविधा पुरविण्यासाठी संस्थांनी अर्ज करावेत जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांचे आवाहन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर,दि.11 (जिमाका): अल्पसंख्याक विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी पात्र संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र संस्थांनी 18 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांनी केले आहे.

शासन निर्णयातील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र संस्थांनी सन 2021-22 साठीचे परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय (नियोजन शाखा), सोलापूर यांच्याकडे 18 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावेत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही श्री. दराडे यांनी कळविले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here