अरुणा जैतपाल यांना “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” पुरस्कार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अरुणा जैतपाल यांना “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” पुरस्कार

मुंबई:- कोरोनाच्या काळात सर्व सणांवर निर्बंध आल्यावर “होळी कशी साजरी होणार?” हा प्रश्न उदभवल्यावर पर्यावरणाची हानी ही होणार नाही व सण ही पारंपारिक पद्धतीने व आनंदाने साजरा होईल’ यासाठी मुंबईतील भायखळा येथील अरुणा मनोहर जैतपाळ यांना ‘छोटी होळी’ ही संकल्पना सुचली, ती देशातील सर्वात ‘छोटी होळी’ ठरली असून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने याची नोंद घेऊन अरुण जैतपाल यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड हा पुरस्कार जाहीर केला.अरूणा जैतपाल यांना प्रशस्ती पत्र, मेडल व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारा साठी अतुल लटम, सचिन बरदाडे, राज जैतपाळ, जयदीप कुलकर्णी ,अजय कदम,अविनाश दळवी , ऋषी परब, स्वप्नील टाकळे’ यांनी विशेष मदत केली. हा पुरस्कार अरुणा जैतपाल यांनी सामाजिक कार्यकर्ते, सिद्धिविनायक मंदिर-न्यास चे माजी विश्वस्त ‘कै धनंजय बरदाडे ” यांना समर्पित केला आहे.अरुणा जैतपाल यांचे वडील मनोहर जैतपाल, व आई सुमित्रा जैतपाल हे समाजसेवक होते. तसेच आजी सूनबाई जैतपाल, व भाऊ राज जैतपाल हे कलाकार होते. त्यांचा वारसा अरुणा चालवत असून त्या पश्चिम रेल्वे प्रशासनात कार्यरत आहेत. त्यांना नाट्य-कला क्षेत्राची आवड असून समाजाची सेवा करण्याची त्यांचा मानस आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here