अभि”जीत” या नावाप्रमाणेच आपली “जीत” होत रहावी:हभप जयवंत महाराज बोधले यंंदाच्यावर्षी एक हजार ट्रॅक्टर विक्री करण्याचे उद्दिष्ट:चेअरमन अभिजीत पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

समृद्धी ट्रॅक्टर्सच्या नुतनीकरण समारंभ संपन्न!

अभि”जीत” आहे या नावाप्रमाणेच आपली “जीत” होत रहावी:हभप जयवंत महाराज बोधले

कारखान्यातील व राजकारण्यातील “वर्म”अभिजीत आबांना कळले आहे:हभप, जयवंत महाराज बोधले

यंंदाच्यावर्षी एक हजार ट्रॅक्टर विक्री करण्याचे उद्दिष्ट:चेअरमन अभिजीत पाटील

मंगळवेढा येथे समृद्धी ट्रॅक्टर्सच्या नुतनीकरण समारंभ दिमाखात संपन्न पार पडला याप्रसंगी ह.भ.प.जयवंत महाराज बोधले,मा शिवाजीरावकांळुगे सर, बबनराव आवताडे,(संचालक डि सी सी,बॅक)संजय मालक आवताडे, सचिन जाधव,(एम,डी जकराया शुगर) ,भैरवनाथ शुगरचे अनिल दादा सावंत,दामाजी सहकारी साखर कारखान्याचे तानाजी खरात, डॉ.बीपी रोंगेसर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी हभप जयवंत महाराज बोधले म्हणाले की, ट्रॅक्टर दुरुस्त करता.. करता.. ते आज ट्रॅक्टर शोरुमचे मालक झाले आहेत “दुरुस्त” करणे हा गुण घेवून अभिजीत पाटील यांनी आजपर्यंत सहा कारखाने दुरुस्त करून यशस्वीरीत्या चालवले आहेत.
कुठे कसे कधी भार द्यायचा हे वर्म अभिजीत पाटील यांना चांगल्या पद्धने कळाला आहे. तुमचे अभि”जीत” आहे या नावाप्रमाणेच आपली “जीत” होत रहावी अशी भावना हभप जयवंत महाराज बोधले व्यक्त केली.


यावेळी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की, सुरवातीचा काळ हा संघर्षाचा असताना 2010 साली ट्रॅक्टरची डिलरशीप घेतली त्याला आज 12 वर्ष पूर्ण झाले आजपर्यंत तब्बल सहा हजार ट्रॅक्टर विक्री झाले आहे.
यातून समोरचा व्यक्ति कसा आपल्या पार्टीत येत नाही, तोपर्यंत प्रयत्न करायचा म्हणजेच पाठपुरावा करणे हे शिकण्यास मिळाले. यंंदाच्या वर्षी एक हजार ट्रॅक्टर विक्री करण्याचे उद्दिष्ट असून तो पुर्ण होईल असा विश्वास व्यक्त पाटील यांनी केला.

यावेळी ह.भ.प.जयवंत महाराज बोधले,मा शिवाजीरावकांळुगे सर, बबनराव आवताडे,(संचालक डि सी सी,बॅक), संजय (मालक) आवताडे, सचिन जाधव,(एम,डी जकराया शुगर), भैरवनाथ शुगरचे अनिल (दादा) सावंत, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे तानाजी खरात, डॉ.बीपी रोंगेसर, अजित जगताप, भारत नागणे, कन्हैया जाधव, अभिजीत हैबतराव कदम, पांडुरंग ताड,(मा नगराध्यक्ष), ज्ञानेश्वर भगरे(मा नगराध्यक्ष), अँड सुजित कदम,(अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ), विठ्ठलचे सर्व संचालक, विठ्ठल पाटील, नवनाथ नाईकनवरे, गोपाळ पाटील,प्रवीण कोळेकर, विठ्ठलचे सर्व संचालक मंडळ ,सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here