अनगर-पंढरपूर नेतृत्वांचा ‘भीमात’ सक्रिय सहभाग नसण्यामागे एक प्रगल्भ विचार असू शकतो! अजूनही वेळ गेलेली नाही बिनविरोध चा विचार व्हावा!-प्रा.संग्राम चव्हाण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कोथाळे येथून उगम पावलेल्या भीमा बचाव समितीचा ओघळ टाकळी सिकंदर पर्यंत येऊन आटला. तो व्हाया टाकळी सिकंदर मार्गे अनगर पर्यंत व व्हाया सुस्ते मार्गे पंढरपूर पर्यंत पण पोहोचू शकला नाही.सुरुवातीला या प्रवाहाचा खूप “खळखळाट”झाला. परंतु अनगर व पंढरपूर येथील सखोल व शांतपणे वाहणाऱ्या मोठ्या प्रवाहापर्यंत सुद्धा या प्रवाहाला पोहोचता आले नाही.भीमा निवडणुकीची अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया तोंडावर आली तरी पंढरपूर व अनगर येथील सहकारातील प्रगल्भ नेतृत्वांनी भीमाची निवडणूक लावण्या विषयी व सक्रिय सहभागा विषयी आजपर्यंत एकही विधान प्रसिद्धी माध्यमांना दिलेले दिसत नाही.या दोन्ही अनुभवी व सखोल विचार सरणीच्या नेतृत्वांना सद्य परिस्थितीतील साखर कारखानदारी पुढील आव्हानांची चांगली जाण असून भीमा पुढील समस्या व सभासदांच्या हिताचे त्यांना गांभीर्य आहे.प्राप्त परिस्थितीमध्ये भीमा रुपी रथाचे सारथ्य केंद्र व राज्य या दोन्हीकडे सत्ता असलेल्या पक्षाचे देशातील प्रभावी खासदार धनंजय महाडिक यांच्या कडेच ठेवणे जास्त योग्य व फायदेशीर राहील असाच उदात्त विचार जणू या दोन्ही नेतृत्वांनी केलेला दिसून येत आहे. कार्यकर्त्यांच्या हट्टा पायी सभासदांवर निवडणूक लादणे उचित नसून भीमाची निवडणूक लावून संचालक मंडळ बदलण्याने भीमा कारखान्या पुढील आव्हाने संपणार नाहीत व ही आव्हाने पेलण्यासाठी महाडिक साहेब आज सक्षम आहेत. “करणाऱ्याला करू द्यावे “या मागणी या सभासदांच्या मागणी प्रमाणे दोन्हीही जाणकार नेतृत्वांनी आतापर्यंत दाखवलेली तटस्थता हे वैचारिक प्रगल्भतेचे आदर्श लक्षण असून हा मोठा विचार भीमाच्या 20,000 सभासदांना आवडलेला आहे व या भूमिकेचे भीमा च्या सूज्ञ सभासदांनी स्वागतच केलेले दिसत आहे. या दोन्हीही नेतृत्वा बाबत सभासदांच्या मनात नितांत आदर असून भीमा बिनविरोध करण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही.तेव्हा सभासदांचे व्यापक हित लक्षात घेऊन सर्व जबाबदार नेतृत्वांनी सभासदां च्या इच्छेचा आदर करून ही निवडणूक बिनविरोध करावी असे विनम्र आवाहन सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. संग्राम चव्हाण यांनी आज पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी
शी बोलताना केले. 15 वर्षांपूर्वी लहान वय असूनही हीच प्रगल्भता दाखवत खुद्द संस्थापक स्व.भीमरावदादांचे चिरंजीव असूनही मुन्नासाहेब महाडिक यांनी पंढरपूरकर व अनगरकर यांना भीमाची निवडणूक बिनशर्त बिनविरोध दिली होती याचीही आठवण यावेळी श्री.चव्हाण यांनी करून दिली. याप्रसंगी व्हा. चेअरमन सतीश जगताप व सर्व संचालक मंडळ, शिवाजीराव गुंड पाटील,भारत पाटील सुनील चव्हाण,राजू बाबर,पांडुरंग ताटे, झाकीर मुलाणि, सज्जन पवार,नाना पवार,प्रा.राजकुमार पाटील,माऊली जाधव,प्रा.बाबा साहेब जाधव,प्रमोद जाधव भारत,जाधव विकिल चव्हाण, तात्यामामा नाग- टिळक,भीमराव वसेकर,प्रशांत वसेकर,सिद्धेश्वर, अनुसे पोपट सोनटक्के,अनिल यादव,अनंत चव्हाण,गणेश चव्हाण,शरद चव्हाण इ.भीमा परिवाराचे मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here