८० महिलांची गर्भाशयाच्या मुखाचा कँन्सर  तपासणी भारत विकास परिषदेचा उपक्रम 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
भारत विकास परिषद ,पंढरपूर व डॉ काणे मेडिकल असोसिएशन  यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल सोलापूर यांच्या सहकार्याने महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर निदान शिबीर संपन्न झाले. या शबिरात पंचक्रोशीतील ८० महिलांची मोफत तपासणी करण्यात आल्याची माहिती भारत विकास परिषदचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र काणे यांनी दिली. 
           महिलांची गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे वेळेचं निदान झाले तर तो बरा  होतो. या बाबतची जनजागृती करण्यासाठी भारत विकास परिषद , डॉ काणे मेडिकल असोसिएशन तसेच सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल यांच्या वतीने महिलांची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा साधना नागेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीती आणि भाविप चे डॉ सुरेंद्र काणे , वि मा मिरासदार, मिलिंद वाघ तसेच सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटलचे  डॉ अवधूत डांगे, डॉ श्रीकांत हुल्ले यांच्या उपस्थित पार पडला. कार्यक्रमाची सुरवात स्वामी विवेकानंद  यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या वेळी बोलताना साधना भोसले म्हणाल्या कि, महिलांनी कॅन्सर या शब्दाला घाबरून जाऊ नये. नवं नवीन तंत्रज्ञान आणि मेडिकल क्षेत्रात प्रगती होत आहे. त्यामुळेच वेळीच निदान केले तर इलाज होऊन बरे देखील झाले असल्याचे त्यांनी सांगितले. 
       तर भारत विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र काणे यांनी प्रास्तविकात आत्ता पर्यंत १० शिबीर घेतले आहेत. या मध्ये ८ महिलांना कॅन्सरची प्रथामिक लक्षणे दिसून आली. त्या पैकी ३ महिलांना कॅन्सर झाला. त्या तिघीनी पुढील उपचार घेतला असून सध्या त्या तिघी निरोगी आहेत. मात्र या बाबत महिलांनी तपासणी करण्यासाठी पुढे यावे असे आव्हान केले. तर महिलांच्या कॅन्सर बाबत जागरूकता आणि वेळीच तपासणी केली तर कँसर सारखा आजार देखील बरा  होतो. असे डॉ वर्षा काणे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार केसकर यांनी केले. तर स्वागत मिलिंद वाघ यांनी तर आभार डॉ अनिल पवार यांनी मानले. या कार्यक्रमात वंदे मातरम् व राष्ट्री गीत गायन प्रा. माधुरी जोशी यांनी केले
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here