७५ व्या अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनानिमित्त आ. मा.समाधानदादा आवताडे यांनी घेतले श्री विठ्ठलाचे दर्शन! (व्यवस्थापक व सर्वाचे मार्गदर्शक मा श्री.बालाजी पूदलवाड यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ब्रिटिशांच्या १५० वर्षे गुलामगिरी जोखडातून भारत देशाला स्वातंत्र्य मुक्ती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करण्याचा मंगलमय दिवस म्हणजे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन होय.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२२ म्हणजे ७५ व्या अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रिय जनसेवक आमदार मा.समाधानदादा आवताडे यांनी मायबाप श्री विठ्ठल – रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन माझ्या पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील सर्व जनतेला शुभेच्छा सर्व जनता सुखी समाधानी राहो अशी श्री.विठ्ठल चरणी प्रार्थना केली.

सदर प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक व सर्वाचे मार्गदर्शक मा श्री.बालाजी पूदलवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तआमदार महोदय यांनी मानाचा फेटा बांधून यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस साठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रांताधिकारी श्री.गजानन गुरव साहेब, डी.वाय.एस. पी.विक्रम कदम साहेब, नगरपालिकेचे CO अरविंद माळी साहेब,BDO प्रशांत काळे, तहसीलदार सुशील बेल्हेकर सो,PI अरुण पवार साहेब,युवा नेते महेश चव्हाण,जेष्ठ पत्रकार अमीन शेख, विनोद राज लटके, भैयासाहेब कळसे, लखन थिटे,शेखर भोसले, दत्ता काळे महाराज, भास्कर तात्या जगताप, प्रा.शरद चव्हाण सर,अमोल धोत्रे, पांडूरंग करकमकर, पांडूरंग वाडेकर, राहुल गावडे, शंतनु पवार,प्रवीण पिसाळ,आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here