१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी! (ॲड.श्री.राजेशजी भादुले यांनी साधला वरीष्ठांशी संपर्क; लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू दिले आश्वासन)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी!

(ॲड.श्री.राजेशजी भादुले यांनी साधला वरीष्ठांशी संपर्क; लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू दिले आश्वासन)

जुन्या पेन्शनचा लढा अधिक बळकट करण्यासाठी राज्याध्यक्ष वितेश खांडेकर आणि जिल्हाध्यक्ष रामराव शिंदे यांच्या निर्देशानुसार आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने काँग्रेस कमिटी पंढरपूरचे शहराध्यक्ष मा.ॲड.श्री.राजेशजी भादुले यांना निवेदन देण्यात आले.

१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने १९८२-८४ची जुनी पेन्शन योजना बंद करून डी.सी.पी.एस. व एन.पी.एस. नावाची अन्यायकारक नविन पेन्शन योजना लागू केली आहे ही नविन पेन्शन योजना शेअर मार्केट वर अवलंबून असून निवृत्ती नंतर पेन्शन ची कोतणतीही हमी देण्यात येत नाही, त्यामुळे देशातील सर्वाच शासकीय कर्मचाऱ्यांत मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.

देशात सर्वप्रथम राजस्थान मधील अशोकजी गहलोत व छत्तीसगढ मधील बघेल या दोन्ही राज्यामधील काँग्रेस सरकारने कर्मचाऱ्यांना १९८२-८४ची जुनी पेन्शन योजना पुन्हा पुर्वरत लागू केली आहे त्याबद्दल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा पंढरपुरच्या वतीने त्यांचे आभार मानले.

तसेच मा.नानाभाऊ पटोले यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचे आश्वासन दिले त्याच प्रमाणे १५ मार्च २०२२ रोजी विधानसभेत महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी केली त्याबद्दल ही पटोले यांचे आभार मानले.

राजस्थान छत्तीसगढ या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात ही आपल्या पक्षाने १ नोव्हेंबर २००५नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी व निवृत्ती नंतरच्या कर्मचाऱ्यांचे जीवन सुरक्षित करावे अशी मागणी केली आहे. पंढरपूर व महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसोबत आपल्या पाठीशी उभे राहू असे आश्वासन यावेळी दिले.

सर्वात विशेष बाब म्हणजे मा. श्री.भादुले साहेब यांनी भेटीदरम्यान महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री मा. श्री बाळासाहेब थोरात, मा. श्रीमती यशोमती ठाकूर बाल विकास मंत्री, मा. आदिती तटकरे विधी व न्याय मंत्री, मा. श्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री यांचे पीए यांच्याशी फोन वरती संपर्क साधू आम्हा सर्वांसमक्ष संपर्क साधला व जुनी पेन्शन लागू करण्याबाबत चर्चा केली. तसेच महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री नानाभाऊ पटोले यांच्या सह वरील सर्व माननीय मंत्री महोदय यांना आपण दिलेले जुनी पेन्शनचे निवेदन मोबाईल द्वारे पाठवले.

 

यावेळी मा.श्री भादुले साहेब यांना निवेदन देताना श्री विजय राऊत जिल्हा उपाध्यक्ष,श्री रियाज मुलाणी तालुकाध्यक्ष,श्री सुनील पावरा कोषाध्यक्ष,श्री गुरुदत्त बाबर,श्री हनुमंत पवार,श्री बालाजी गालशेटवार,श्री विजय सोळसे, श्री विकास कांबळे ,श्री राहुल आर्वे, श्री माधव मारकवाड,श्री संदीप खेडकर,
आदी मान्यवर व पेन्शन फायटर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here