ह.भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे नूतन चेअरमन अभिजीत (आबा) धनंजय पाटील यांच्या व प्राध्यापक महादेव तळेकर सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील यशवंत विद्यालयाच्या ग्राउंडवर ह भ प निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या सुश्राव्य अशा कीर्तनाचा सर्व भोसे, मेंढापूर, करकंब, व भागातील सर्व ग्रामस्थांनी लाभ घेतला.

पडत्या श्रावण सरींनी चिंब झालेल्या सर्व श्रोत्यांना ह भ प निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी कीर्तनाच्या माध्यमातून मनमुरादपणे हसविले, व आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन केले. हा कार्यक्रम भोसे येथील यशवंत शाळेच्या पटांगणावरती सायंकाळी ७ वाजता संपन्न झाला. या कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी हजेरी लावून रंगत आणली. यावेळी त्यांनी आपल्या मनोगत आतून येत्या काही दिवसांमध्ये नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून पंढरपूर येथे २०० कोटी रुपयांचे संतपिठ उभा करणार असल्याचे यावेळी जाहीर केले! यावेळी त्यांनी अभिजीत पाटील यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कामाचे मनुष्यक्तपणे कौतुक केले व आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे यावेळी आवर्जून आपल्या मनोगतातून यावेळी सांगितले! हा कार्यक्रम अभिजीत आबा पाटील यांचे खंदे समर्थक प्रा. महादेव तळेकर सर यांनी आयोजित केला होता.

यावेळी आ.शहाजी (बापू) पाटील, विठ्ठलाचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील, प्रेमलता बबुवाहन रोगें प्राध्यापक महादेव तळेकर सर,प्रा. तज्ञ संचालक, ‌ प्रा.तुकाराम मस्के, भाजपचे अजय जाधव, संचालिका,श्रीमती कलावती खटके ॲड.नितीन खटके, महेशकाका खटके, गणेश थिटे,भारत कोरके, कांचन कोरके,
विठ्ठल,चे सर्व नुतन संचालक मंडळ, आदी सर्व मान्यवर व अभिताभ पाटील यांच्यावर प्रेम करणारे असंख्य सर्व सभासद, पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते!

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here