ही निवडणूक सहकारी संस्थेची आहे! पक्षाची नाही!
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून यामध्ये विविध तीन पॅनल उभे असून प्रत्येक पॅनल कडून प्रचारही सुरू आहे!
त्याचदरम्यान श्री विठ्ठल परिवर्तन पॅनलकडून प्रचार करीत असताना सोशल मीडियावर त्यांच्या चिन्हासहित पक्षाच्या चिन्हाचे हि वापर केलेला आढळून आले आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्षाची नसून एका सहकारी संस्थेची आहे! यामुळे पक्षाच्या चिन्हाचे कोणीही गैरवापर करू नये! अन्यथा आम्ही यावर कडक कारवाई करू असे यावेळी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुक अधिकारी यांना निवेदन देताना प्रसारमाध्यमांशी बोलताना यावेळी सांगितले.
यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शहराध्यक्ष सुधिर भोसले, कार्याध्यक्ष रणजित पाटील जिल्हा उपाध्यक्ष बापू शिंदे, तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण, युवक अध्यक्ष स्वप्निल मारू जगताप,तालूका उपाध्यक्ष शिवाजी सलगर, औदुंबर शिंदे व आदि पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.