हरिश्चंद्र फाउंडेशन च्या वतीने गोरगरिबांची दिवाळी केली गोड!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

दरवर्षी स्व हरिश्चंद्र फाऊंडेशनच्या माध्यमातून व दानशूर दात्यांच्या साहाय्याने उपेक्षित व गरजू कुटूंबाना खारीचा वाटा म्हणून मदत केली जात असते.याहीवर्षी पंढरपूर तालुक्यातील पुळूज गावाचे शहिद जवान पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांच्या स्मृतींना उजाळा देत दत्तात्रय पांढरे यांच्या सहकार्याने गरीब,उपेक्षित व गरीब कुटूंबाना दिवाळीचे किट वाटप करण्यात आले..!

यावेळी वीर पिता तानाजी होनमाने बंधू, विकास होनमाने, किसन जाधव, रतिलाल गावडे, मोहन खरात,लक्ष्मण पांढरे, ज्ञानेश्वर मदने,लक्ष्मण धनवे अंबादास बाबर,उत्तम भोसले प्रकाश खरात पंडित खाडेकर बंडू मुलाणी,तुकाराम तेरवे प्रकाश खरात,सर्जेराव होनमाने लिंगादेव निळगुंडे, युवराज शिंदे,बापु शिंदे, अश्रुभान येळे,रमेश खरात ,अनिल शेंडगे, पप्पू कोंडकर ,हरिचंद्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा गायकवाड सर,अध्यक्ष पंढरीनाथ कदम,शाळा समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे व आदी मान्यवर उपस्थिती होते.

चौकट- 

स्व. हरिश्चंद्र फाउंडेशनच्या माध्यमातून दत्तात्रय पांढरे सरांनी अनेक समाज उपयोगी सामाजिक उपक्रम आजपर्यंत राबवले आहेत त्याच बरोबर सर्व गोरगरीब कष्टकरी व दीनदलित दुबळ्या लोकांना मोठ्या प्रमाणात मदतही केली आहे त्यांनी यावेळी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील अनेक गरजू कुटुंबांना दिवाळीचे किट वाटप केले त्याच बरोबर अनेक नागरिकांना व कुटुंबियांना फराळाचे वाटप सुद्धा दत्तात्रय पांढरे सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून केल्या मुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here