स्व.स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियाला शासनाने तात्काळ मदत करावी; मोहोळ तालुका भाजपाकडुन तहसिलदारांना निवेदन.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

स्व.स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियाला शासनाने तात्काळ मदत करावी; मोहोळ तालुका भाजपाकडुन तहसिलदारांना निवेदन.

सोलापुर // प्रतिनिधी

MPSC उत्तीर्ण विद्यार्थी स्वप्नील लोणकर यांनी सरकार नौकरी लावत नाही म्हणून आत्महत्या केली. ती आत्महत्या नसून सरकार पुरस्कृत हत्त्या आहे हा सरकारच्या गलथान कारभाराचा बळी आहे. एका चांगल्या भावी अधिका-याला देश मुकला आहे. त्यामुळे अशा स्व. भावी अधिका-याच्या कुटूंबाला शासनाने तात्काळ 50 लाख रुपये मदत राज्य सरकारने करावी. व स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी सरकारी नौकरी मध्ये घेण्यात यावे व तसेच पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या 12 आमदारांचे केलेले निलंबन हे गैर असून हा लोकशाहीचा खुन आहे. तरी हे निलंबन तातडीने माघार घ्यावे अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र प्रकारचे आंदोलन करून सरकारला सळो की पळो करण्यात येईल. असे निलंबन म्हणजे लोकशाहीचा खुन संसदीय लोकशाही मध्ये अपेक्षित नाही. अशा आशयाचे संयुक्त निवेदन मोहोळ तालुका भाजपा.तालुका युवा मोर्चा.व मोहोळ शहर भाजपा यांच्या वतीने मोहोळचे तहसीलदार मा जीवन जीवन बनसोडे साहेब यांना देण्यात आले. व राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर. मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण. तालुका सरचिटणीस महेश सोहणी. भाजप नेते मुजीब भाई मुजावर. जेष्ठ नेते जगन्नाथ वसेकर. मोहोन तात्या होनमाने. अविनाश पांढरे. युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सागर वाघमारे. दिनेश गडदे. पप्पू लांडगे. नवनाथ अनुसे. संतोष नामदे. नवनाथ गाढवे ई यावेळी उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here